शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:57 IST

Crime News: दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

मीरारोड - दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

८ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या रात्री ८ च्या  सुमारास चालक रामलाल पटेल (३७) हे त्यांची गाडी पार्किंग मध्ये उभी करून घरी जात होते.  घरी जात असताना नालासोपारा च्या संतोष भुवन, गौराई पाडा नाका येथील अजय जयस्वाल यांचे भंगार दुकानालगत असलेल्या गल्लीत  सचिन सुनील उपाध्याय याने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरुन पटेल यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटका मारला.  डोक्यास गंभीर दुखापत होवून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असताना पटेल यांचा मृत्यू झाला होता.

मयताची पत्नी उर्वशा पटेल यांच्या फिर्यादी नंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आरोपी  सचिन उपाध्याय हा मागील ४  वर्षापासून फरार होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि पुष्पराज सुर्वे सह संदिप शिंदे, किशोर वाडीले, पुषेंद्र थापा, अविनाश गर्जे,  विकास राजपुत, सुमीत जाधव यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू केला होता.

बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन उपाध्याय यास पकडण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेश च्या वाराणसी येथे गेले होते. वाराणसी येथे स्थानिक एस. टी. एफ. यांची मदत घेवून सलग सात दिवस शोधमोहीम राबवत उपाध्याय रा. स्वारीपुर, पो. प्रमकापुर, मछली शहर , जौनपुर ह्याला शुक्रवारी पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMira Bhayanderमीरा-भाईंदर