Crime News: डोळ्यात मिरचीपूड टाकून व्यापाऱ्यास लुटले! ६२ हजार रुपयांची बॅग केली लंपास
By अनिल गवई | Updated: September 20, 2022 14:13 IST2022-09-20T14:12:15+5:302022-09-20T14:13:21+5:30
Crime News: दुकान बंद करून घरी परतणाºया व्यापाºयाच्या चेहºयावर मिरचीपूड टाकून एका व्यापाºयास लुटण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील मुख्य रस्त्यावर घडली.

Crime News: डोळ्यात मिरचीपूड टाकून व्यापाऱ्यास लुटले! ६२ हजार रुपयांची बॅग केली लंपास
- अनिल गवई
खामगाव - दुकान बंद करून घरी परतणाºया व्यापाºयाच्या चेहºयावर मिरचीपूड टाकून एका व्यापाºयास लुटण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील मुख्य रस्त्यावर घडली.
दारू विक्रीचे दुकान असलेले अशोक आनंदराम आयलानी (६८) सोमवारी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान दुकान बंद करून घरी दुचाकीने झुनझुनवाला प्लॉट येथे परतत होते. त्यावेळी एका मोटारसायकल स्वाराने पाठलाग करीत, त्यांची दुचाकी एमएच २८ बीएन ०१६१ अडविली. त्यांच्या जवळील बॅग मागितली. आयलानी यांनी बॅग देण्यास नकार दिला. त्यावेळी दुचाकीवरील इसमाने आयलानी यांच्या चेहºयावर मिरचीपूड टाकून चाकूचा धाक दाखवित ६२ हजार रुपयांची बॅग लंपास केली. यावेळी झालेल्या झटापटीत दुचाकीवरील इसमाने आयलानी यांच्या मनगटावर तसेच अंगठ्यावर वार केला. यात अशोक आयलानी हे जखमी झाले. ही घटना नजीकच्या सीसीकॅमेºयात कैद झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३९४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.