शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सावकारी जाचानेच गेले ९ जणांचे बळी, सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणात १५ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:00 IST

Crime News: डाॅ. माणिक वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक केली आहे. वनमोरे बंधूंनी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते.

सांगली : डाॅ. माणिक वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक केली आहे. वनमोरे बंधूंनी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते. त्यातून वारंवार होणारा अपमान, पैशासाठी तगादा यामुळे वनमोरे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.अटक केलेल्यांमध्ये नंदकुमार पवार (५२), राजेंद्र बन्ने (५०), अनिल बन्ने (३५), खंडेराव शिंदे (३७), डाॅ. तात्यासाहेब चौगुले, रेखा चौगुले (४५), शैलेश धुमाळ (५६), संजय बागडी (५१), अनिल बोराडे (४८), शिवाजी कोरे (६५), विजय सुतार (५५), पांडुरग घोरपडे (५६), प्रकाश पवार (४५) यासह १५ जणांचा समावेश आहे. फरार १२ जणांचा शोध सुरू आहे.

दिली होती जीवे मारण्याची धमकीपोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले की, वनमोरे कुटुंबाने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाची परतफेड करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. सावकारांकडून कुटुंबीयांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गावातील चौकात अडवून वारंवार अपमान करण्यात येत होता. मिरज शासकीय रुग्णालयात नऊ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल राखून ठेवला आहे.

काय आहे दोन चिठ्ठ्यांमध्ये?डाॅ. माणिक वनमोरे व त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली आहे. खासगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतले असून, त्याची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. हे कर्ज व्यापारासाठी घेतले होते, असा उल्लेख त्यात आहे; पण किती रक्कम घेतली होती, याचा उल्लेख नाही.

अटक केलेल्यांमध्ये सावकार, डाॅक्टर, शिक्षक- अटक केलेल्यांमध्ये डाॅक्टर, शिक्षक, एसटी वाहकाचा समावेश आहे. तात्यासाहेब चौगुले वैद्यकीय डाॅक्टर, अनिल बोराडे शिक्षक, संजय बागडी एसटी वाहक आहे. - नंदकुमार पवार याचे बेकरी दुकान, तर शैलेश धुमाळ याचा हाॅटेलचा व्यवसाय आहे. प्रकाश पवारचे स्टेशनरी दुकानआहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शैलेशव आशिष धुमाळ या सावकारांचा समावेश आहे. दोघांवर याआधी हद्दपारीची कारवाई झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली