Crime News: ४३ हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By भगवान वानखेडे | Updated: October 14, 2022 16:59 IST2022-10-14T16:58:32+5:302022-10-14T16:59:23+5:30
Crime News: शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका जणास अटक केली. त्याच्याकडील ४३ हजार ५६० रुपयांचा गुटखा आणि वाहनासह इतर साहित्य असा एकुण १ लाख ९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Crime News: ४३ हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- भगवान वानखेडे
बुलढाणा : शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका जणास अटक केली. त्याच्याकडील ४३ हजार ५६० रुपयांचा गुटखा आणि वाहनासह इतर साहित्य असा एकुण १ लाख ९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ सप्टेंबर रोजी नांदुरा-खामगाव रोडवर केली.
एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पराग राजेश भट्टड (३०,रा.फरशी,खामगाव) हा खामगाव नांदुरा येथून खामगावकडे प्रतिबंधीत गुटखा घेऊन जात होता. कारवाईसाठी पथकाने नांदुरा येथील शासकीय विश्राम गृहासमोर नाकाबंदी करुन पखताने वाहन क्रमांक एमएच-२८-बीडी-२२२७ ची झडती घेतली असता त्यामध्ये ४३ हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि ६५ हजार ७०० रुपयांचे इतर साहित्य असा १ लाख ९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश किनगेे, ओमप्रकाश साळवे, श्रीकृष्ण चांदुरकर, पोलीस कॉन्स्टेबल केदार फाळके, सतीश जाधव यांनी केली.