शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्समध्ये जास्त पैशांच्या आमिषाने गुंतवणूक केलेल्या १२५ जणांची २ कोटी ६५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 09:25 IST

Crime News : निवृत्त एसटी कर्मचाऱ्याने १० लाख रुपये स्वतःचे आणि नंतर पत्नी, २ मुली व जावई यांचे मिळून एकूण ८३ लाख रुपये गुंतवले.

मीरारोड - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या स्कीममध्ये जास्त पैशांच्या आमिषाने गुंतवणूक करणाऱ्या सुमारे १२५ गुंतवणूकदारांची २ कोटी ६५ लाखांना फसवणूक झाल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे .

भाईंदर पश्चिमेस सालासर क्लासिकमध्ये राहणारे अण्णा अमृते यांची कारवी स्टॉक ब्रोकिंग नावाने राम मंदिर मार्गावरील विनायक इमारतीत कार्यालय आहे. तर त्यांच्यासोबत भागीदार म्हणून काम करणारा कुलदीप रुंगटा हा भाईंदर पूर्वेच्या इंद्रप्रस्थ या आलिशान संकुलात राहतो. शेअर बाजारात पैसे गुंतवणुकीच्या बदल्यात प्रति १ लाखास दरमहा ५ टक्के प्रमाणे ५ हजार तसेच ६ महिन्यांनी आणखी आकर्षक परतावा अशी योजना सुरू होती. 

मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळत असल्याने २०१८ सालापासून फिर्यादी नारायण नीलवे ( ६९ ) रा. सेजलपार्क, घरटन पाडा, दहिसर या निवृत्त एसटी कर्मचाऱ्याने १० लाख रुपये स्वतःचे आणि नंतर पत्नी, २ मुली व जावई यांचे मिळून एकूण ८३ लाख रुपये गुंतवले. त्याच्या विविध कंपन्यांच्या पावत्या नीलवे यांना अमृते यांनी दिल्या  अनेक महिने नीलवे यांना स्कीमप्रमाणे अमृते यांनी पैसे देखील दिले. 

परंतु काही महिन्यांपासून त्यांच्यासह अन्य काही गुंतवणूकदार असलेले बाळासाहेब जाधव, रवींद्र देसाई, रुतेश सुर्वे, दीपक अग्रवाल  संकेत दळवी, सुशांत जाधव, दीपक पिल्ले, विनायक गुरव, सागर झंझुर्णे आदींसह सुमारे १०० ते १२५ जणांकडून गुंतवणुकीचे पैसे घेऊन देखील मोबदला मिळत नसल्याचे नीलवे यांना आढळून आल्यानंतर १४ जुलै रोजी त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन अमृते व रुंगठा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून फसवणुकीची रक्कम जास्त असल्याने सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. लोकांकडून गोळा केलेल्या पैशातून कुलदीप रुंगठा याने आलिशान फ्लॅट खरेदीपासून लग्नासाठी मोठी रक्कम खर्च केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडPoliceपोलिसMONEYपैसा