Crime News: नोकरीच्या आमिषाने १ लाख ६८ हजारांची फसवणूक, बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्र दिले, गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Updated: August 10, 2022 22:04 IST2022-08-10T22:02:38+5:302022-08-10T22:04:08+5:30
Crime News: नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील प्रेमचंद मानकर (३४) यांच्याकडून एका भामट्याने १ लाख ६८ हजारांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली.

Crime News: नोकरीच्या आमिषाने १ लाख ६८ हजारांची फसवणूक, बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्र दिले, गुन्हा दाखल
- जितेंद्र कालेकर
ठाणे - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील प्रेमचंद मानकर (३४) यांच्याकडून एका भामट्याने १ लाख ६८ हजारांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली. संदीप राऊत (३७, रा. दहिसर, मुंबई) या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली.
डोंबिवलीतील कोपर भागातील रहिवासी मानकर यांना मूळ सातारा जिल्ह्यातील वाई येथील रहिवासी असलेल्या राऊत याने ११ मार्च ते १९ जुलै २०२२ या काळात ठाण्यातील राज्य वीज वितरण कंपनीमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखविले. नोकरीचे काम झाल्याचे सांगून त्यांना बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिले. त्यापोटी त्यांच्याकडून १ लाख ६८ हजारांची रक्कम उकळली. त्यांना नोकरी न लावता त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नाहीत. अशाच प्रकारे अन्य चौघांचीही त्याने फसवणूक केली. याबाबत मानकर यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात ९ ऑगस्ट २०२२ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील शिंदे हे करीत आहेत.