ब्रेसलेट चोरी प्रकरणी मोलकरणीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:05 IST2019-05-06T20:04:16+5:302019-05-06T20:05:42+5:30
मीरारोड : सोन्याचे ३५ हजारांचे ब्रेसलेट चोरल्याच्या संशयावरुन मालकीणीने मोलकरणी विरोधात मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

ब्रेसलेट चोरी प्रकरणी मोलकरणीवर गुन्हा
मीरारोड : सोन्याचे ३५ हजारांचे ब्रेसलेट चोरल्याच्या संशयावरुन मालकीणीने मोलकरणी विरोधात मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ज्योत्सना भारती ह्या मीरारोडच्या पूनम सागर कॉम्पलेक्स मधील रिजन्सी एनक्लेव्ह मध्ये राहतात. रविवारी सकाळी त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट तुटल्याने ते बेडरुममधील टेबलावर ठेऊन त्या झोपी गेल्या होत्या. घरकाम करणारी पदमम्मा कत्रे रा. केतकीपाडा, दहिसर ही १९ वर्षांची मोलकरीण सकाळी काम करुन गेली होती.
ज्योत्सना ह्या सकाळी पावणे आकराच्या सुमारास उठल्या असता बे्रसलेट दिसले नाही. शोधाशोध व घरात विचारपुस करुन झाल्या नंतर अखेर रात्री त्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात पदमम्मा विरुद्ध तक्रार दिली. सकाळी पदमम्मा शिवाय बाहेरील दुसरे कोणी आले नव्हते. पोलीसांनी ३५ हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट चोरी प्रकरणी मोलकरीण पदमम्मा विरुध्द गुन्हा दाखल करुन तीची चौकशी चालवली आहे. १ एप्रिल पासुन पदमम्मा घराकामास येत होती.