प्रेम मिळालं नाही म्हणून तो तिला बदनाम करून तिला मिळवण्याचा करण्याच्या प्रयत्नात होता. पण असं होऊ शकतं नाही. त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. आणि त्याला तुरूंगात जावं लागलं. उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) संभलमधून(Sambhal) ही घटना समोर आली आहे. इथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला तिचा एक असा व्हिडीओ पाठवला की, धमाकाच झाला. या व्हिडीओमुळे १० दिवसांपूर्वी लग्न झालेली नवरी बेघर झाली आहे.
ही घटना आहे यूपीच्या(UP) संभल जिल्ह्यातील(Sambhal District) बनिया ठेर गावातील. इथे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न झाल्याने तिच्या पतीला तिचा एक अश्लील व्हिडीओ(Video) पाठवला. हा व्हिडीओ पाहून दहा दिवसांपूर्वीच घरी आणलेल्या नव्या नवरीला नवरदेवाने घराबाहेर काढले. (हे पण वाचा : लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी; एक पोहोचली तुरूंगात, वाचा काय आहे प्रकरण?)
ज्यानंतर नव विवाहितेने आपल्या प्रियकरावर अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तरूणाला अटक करत तुरूंगात टाकलं आहे. (हे पण वाचा : भयंकर! लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची धारदार चाकूने केली हत्या;वडील जखमी)
अप्पर पोलीस अधिक्षक आलोक जयस्वाल यांनी सांगितले की, आरोपी तरूण संभलच्या नखासामध्ये राहतो. आरोपी शरीफचं पीडितेच्या घरी येणं-जाणं होतं. या दरम्यान त्याने पीडितेसोबत संपर्क बनवून अश्लील व्हिडीओ तयार केला.
दहा दिवसांआधीच प्रेयससीचं लग्न झालं तर आरोपी तरूणाने पीडितेला जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. असं न केल्यास तो तिचा व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी त्याने दिली होती. जेव्हा पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचा अश्लील व्हिडीओ तिच्या पतीच्या मोबाइलवर पाठवला. व्हिडीओ पाहून पतीने तिला घरातून काढले.