लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी; एक पोहोचली तुरूंगात, वाचा काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 11:53 AM2021-02-19T11:53:28+5:302021-02-19T12:07:38+5:30

Crime News : पोलिसांनी जेव्हा या दोघींची चौकशी केली तेव्हा दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी (Two Girls Eloped) अडून बसल्या होत्या.

घरातील लोकांना हे समजलं आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. दोघींना पोलिसांनी पंजाबच्या जालंधरमधून अटक केली. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

त्यांना वाटलं त्यांना कुणी अडवणार नाही. पण इथेच कथेच ट्विस्ट आला. दोघींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यांची कहाणी अधुरी राहिली. यातील एक मुलगी आता तुरूंगात आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरातून ही हैराण करणारी घटना समोर आली आहे. दोघी मैत्रिणी एकमेकींच्या अशा प्रेमात पडल्या की, दोघीही घर सोडून पळाल्या. (प्रातिनिधिक छायाचित्र)

अल्पवयीन मुलीच्या आईने आरोप लावला आहे की, शीतलने तिच्या कुटुंबियांसोबत मिळून तिच्या मुलीचं अपहरण केलं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नंतर शीतलला कोर्टात हजर करण्यात आलं आणि नंतर तिला तुरूंगात पाठवलं.

पोलिसांनी जेव्हा या दोघींची चौकशी केली तेव्हा दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून बसल्या होत्या.

दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या.

यानंतर पोलिसांनी अपहरणाच्या केसमध्ये वयस्क मैत्रिणीला कोर्टात हजर केलं आणि तेथून तिला तुरूंगात पाठवण्यात आलं.

दरम्यान, दोन्ही मुली एकाच इंटर कॉलेजमध्ये शिकतात आणि यादरम्यान दोघी कथितपणे प्रेमात पडल्या. त्यानंतर दोघींनी घरून पळून जाण्याचा विचार केला. दोघीही सोबत बाहेर पडल्या.