शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मारणे टोळीतील रुपेश मारणेविरुद्ध गुन्हा; रस्त्यावर केक कापून पसरवली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 21:20 IST

crime news :ही घटना रास्ता पेठेतील चैतन्य इंग्लिश मेडियम स्कुल येथील रस्त्यावर १४ फेब्रुवारी रोजी घडली होती

ठळक मुद्देविविध कायद्यानुसार रुपेश मारणेसह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांनी जमाव बंदीचे उल्लंघन करुन मध्यरात्री भररस्त्यावर वाढदिवसाचाकेक कापून तेथे असलेल्या नागरिकास धमकविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुपेश मारणे व त्याच्या ७ ते ८ समर्थकांवर याच्यावर समर्थपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा

 

ही घटना रास्ता पेठेतील चैतन्य इंग्लिश मेडियम स्कुल येथील रस्त्यावर १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. समर्थ पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव व बालाजी शिंदे हे १४ फेब्रुवारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चैतन्य इंग्लिश मेडियम स्कूलजवळ एक व्यक्ती घाबरलेली दिसली. त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने एक दाढी वाढलेली व्यक्ती रस्त्यावर वाढदिवस साजरा करत आहे. त्या व्यक्तीला वाढदिवस साजरा करणार्‍या व्यक्तीने दमबाजी केली. तसेच, काय बघतोस माज आला का, मी रुपेशदादा मारणे पुण्याचा भाई. तुलाही केक सारखा कापेल, असा दम दिला. त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी गेल्यानंतर रुपेश व त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यानंतर घाबरलेला तरुण देखील निघून गेला. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती घेतली असता आरोपींनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तसेच, पोलिसांच्या नियमांचे पालन केलेले दिसून आले नाही. त्यानंतर विविध कायद्यानुसार रुपेश मारणेसह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे