शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:53 IST

दोन ग्राहकांचे २० लाख रुपये हडपल्याप्रकरणी प्रसिद्ध त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)च्या दोन संचालकांविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदोन संचालक आरोपीच्या पिंजऱ्यात : सराफा वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन ग्राहकांचे २० लाख रुपये हडपल्याप्रकरणी प्रसिद्ध त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)च्या दोन संचालकांविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.हेमंत जव्हेरी (वय ५८, रा. ए. के. अहिर मार्ग, दूरदर्शन वरळी, मुंबई) आणि सागर जव्हेरी (वय ३४, रा. टीबीझेड अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि. अ‍ॅम्बेन्सी अपार्टमेंट, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.सदर छावणीमध्ये टीबीझेडची शाखा (शोरूम) आहे. आठ वर्षांपूर्वी टीबीझेडने गुंतवणुकीवर ग्राहकांना प्रति महिना १.५ टक्के दराची एक विशेष योजना सुरू केली होती. वेकोलितून निवृत्त झालेले आणि सध्या जरीपटक्यात राहणारे उत्तंगराव मारोतराव भोजापाई (वय ६०) यांनी या योजनेत २३ लाख रुपये तसेच त्यांचे मित्र प्रशांतकुमार टायटस यांनी २५ लाख रुपये टीबीझेडकडे गुंतविले होते. ५ सप्टेंबर २०१२ ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी ही योजना होती. ठरल्याप्रमाणे भोजापाई आणि टायटस यांना जव्हेरी अ‍ॅण्ड सन्समधून सुरुवातीला १.५ टक्के दराने प्रतिमाह व्याज मिळत होते. मात्र, २०१६ नंतर टीबीझेडकडून योजनेचा गाशा गुंडाळला गेला. व्याज देणे बंद झाल्याने भोजापाई आणि टायटस यांनी टीबीझेडमध्ये जाऊन आपली रक्कम परत मागितली. प्रारंभी मौनीबाबांची भूमिका वठविल्यानंतर बरेच आढेवेढे घेत त्यांना टीबीझेडच्या संचालकांनी प्रत्येकी १३ आणि १५ लाख रुपये परत केले. मात्र, दोघांचेही प्रत्येकी १० लाख रुपये शिल्लक होते. ते देण्यास फर्मचे संचालक वेगवेगळे कारण सांगून रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ करू लागले. त्यामुळे या दोघांनी सप्टेंबर २०१९ मध्ये सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सोमवारी याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)चे संचालक हेमंत जव्हेरी आणि सागर जव्हेरी या दोन संचालकांंविरुद्ध फसवणुकीचे कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.यापूर्वीही असेच घडले होते !टीबीझेडच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी तेथे अशीच फसवणूक झाल्याची चौघांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. ते कसेबसे सेटल करण्यात आले. आता पोलिसांनी कारवाईची तयारी चालविली आहे. लवकरच जव्हेरी यांना अटक करण्यासाठी सदर पोलिसांचे पथक मुंबईला जाणार असल्याची माहिती सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी