शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित मृत शिक्षकाच्या खिशातील रोकड लांबविणाऱ्या ५ वॉर्डबॉयविरुध्द गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 20:42 IST

Crime News : पाच वॉर्डबॉय विरोधात भादंवि कलम ४०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनेचा तपास करीत आहेत. 

ठळक मुद्देमयत शिक्षकाचे मित्र दीपक रमेश पाटील यांनी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ फिर्यादीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रुग्णालयातील पाच वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

धुळे : येथील वाडीभोकर रोडवरील खासगी श्री गणेशा हॉस्पीटलमध्ये  शिरपूर येथील शिक्षक धनराज माळी यांना कोरोनाबाधीत झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते़ त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या खिशातून रोख रक्कम काढून घेण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता़ त्यानंतर आज दिवसभर सोशल मिडीयावर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडीओ व्हायरल झाले होते़ शनिवारी  सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मयत शिक्षकाचे मित्र दीपक रमेश पाटील यांनी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ फिर्यादीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रुग्णालयातील पाच वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

कोरोना महामारीत सर्वत्र हाहाकार माजत असताना काहीजण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत तर काही संधीच सोन म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहे. असाच प्रकार शहरातील वाडीभोकर रोडवरील श्री गणेशा रुग्णालयात घडला़ शुक्रवारी रुग्णालयात दाखल शिरपूर येथील शिक्षक धनराज माळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ मृतदेह ताब्यात घेत असताना नातेवाईकांनी मयताचे खिसे तपासले असता त्यात त्यांनी सोबत आणलेले पैसे आढळून आले नाही़ तेव्हा रुग्णालयातील कर्मचाºयांची विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ तेव्हा नातेवाईकांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली़ त्यात  रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे दिसून आले़ ही महिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर नातेवाईक मयताचे मृतदेह घेवून शिरपूरला रवाना झाले़  शनिवारी यासंदर्भात रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाले़ सायंकाळी मयत धनराज माळी यांचे मित्र दीपक रमेश पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार पाच वॉर्डबॉय विरोधात भादंवि कलम ४०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनेचा तपास करीत आहेत. 

Video : माणुसकीला काळिमा! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले; मृत कोरोना रूग्णाच्या खिशातील ३५ हजार रूपये काढून घेतले

देवपुरातील श्री गणेशा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे़ दाखल तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल़ त्यानुसार, त्यात दिसणारे पाच वॉर्डबॉय यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येईल़ सध्या कोरोना काळ सुरु असल्यामुळे त्यांना तुर्त बोलाविण्यात येणार नाही़. - चंद्रकांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, देवपूर पोलीस स्टेशन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या