सांडोर जमीन घोटाळ्यात ४६ जणांविरुद्ध गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:50 AM2018-11-08T02:50:15+5:302018-11-08T02:50:31+5:30

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग आय समितीच्या सांडोर येथील जमीनीबाबत गैरव्यवहार झाला असून त्यात मूळ मालकाच्या सातबाऱ्याच्या उता-यात खाडाखोड करून खोटी कागदपत्रे बनवली गेली आहेत.

Crime against 46 people in Sangrur land scam | सांडोर जमीन घोटाळ्यात ४६ जणांविरुद्ध गुन्हे

सांडोर जमीन घोटाळ्यात ४६ जणांविरुद्ध गुन्हे

Next

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग आय समितीच्या सांडोर येथील जमीनीबाबत गैरव्यवहार झाला असून त्यात मूळ मालकाच्या सातबाऱ्याच्या उता-यात खाडाखोड करून खोटी कागदपत्रे बनवली गेली आहेत. ५ एकर २९ गुंठे जमीनीत फक्त २ एकर जमीन दाखवून ३ एकरमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आल्यानंतर पालघर अधिक्षकांनी आदेश देऊन यात सामिल असलेल्या ४६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यात अनेक प्रतिष्ठित असून त्यांची नावे द्वेषापोटी घेतल्याचा आरोप आहे.
या जमीनीबाबत तक्र ारदार मायकल प्रधान याने आपली आई वेरोनिका जॉन प्रधान तथा पूर्वाश्रमीच्या वेरोनिका अंतोन फरेरा यांच्या माहेरची वडीलोपार्जीत जमीन असल्याचा दावा केला असून तिचे क्षेत्रफळ ५ एकर २९ गुंठे आहे. तिच्या काकांच्या निधनानुसार तिच्या नावे कुलमुखत्यार पत्राने करण्यात आली. मात्र या जागेच्या सातबाºयात फेरफार करून तिचे क्षेत्रफळ कमी केले गेल्याचा आरोप तक्र ारदाराने केला आहे. या जागेवर ४६ आरोपींपैकी काही आरोपी विकासकांनी इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र आता आपली फसवणूक झाल्याचे सांगून प्रधान याने अधिक्षक गौरव सिंग यांच्याकडे धाव घेत तक्र ार केली. त्यांच्या आदेशानुसार वसई पोलिस ठाण्यात या गैरव्यवहारात सामिल असलेले विकासक, पालिका अधिकारी, महसूल, भूमी आलेखन अधिकारी, वास्तूविशारद, नगररचना , तलाठी, वकील यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे आदि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत वसई पोलिस निरीक्षक सागर टिळेकर अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हे प्रकरण पालघर आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केले असल्याची माहिती दिली. मात्र सांडोर जमीन घोटाळ्यात निरपराध व्यक्तींनाही नाहक गोवले जात असल्याचा आरोप आता करण्यात येत असून याबाबत निष्पक्ष चौकशी करून नंतरच गुन्हे दाखल करण्यात यायला हवे होते असे चर्चिले जात आहे. अनेक प्रतिष्ठित वकीलांची नावे आरोपी म्हणून यात देण्यात आल्यामुळे ती आता उच्च न्यायालयाची पायरी गाठण्याच्या पवित्र्यात आहेत.

तक्रारीनुसार 46 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र चौकशीनंतरच याबाबत करवाई करण्यात येईल.याबाबत तपास सुरू आहे.
- गौरव सिंग,
पोलिस अधीक्षक पालघर

या प्रकरणाचा आमच्याशी काडीमात्र संबंध नाही.जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याअगोदर चौकशी करणे गरजेचे होते.हे आरोप बिनबुडाचे आहेत.
- संजय हेरवडे,
पालिका अतिरिक्त आयुक्त

Web Title: Crime against 46 people in Sangrur land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.