नवी दिल्ली : ऑनलाइन बेटिंग अर्थात सट्टेबाजी व गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित एका मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) काही क्रिकेटपटू व अभिनेत्यांची मालमत्ता जप्त करू शकते. त्यांनी ऑनलाइन बेटिंग ॲपच्या जाहिरातींमधून मिळालेल्या पैशाचा वापर विविध प्रकारच्या संपत्ती खरेदी करण्यासाठी केला असल्याचे ‘१ एक्सबेट’ या पोर्टलशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीतून समोर आल्याची माहिती रविवारी ईडीच्या सूत्रांनी दिली.
या लोकांची झाली चौकशीऑनलाइन बेटिंगप्रकरणी ईडीने क्रिकेटपटू युवराज सिंह, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, शिखर धवन व चित्रपट अभिनेता सोनू सूद, मिमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार), अंकुश हाजरा यांची चौकशी केली आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीदेखील ईडीने चौकशी केली आहे. मनी लाँड्रिंग कायद्याच्या कमल ५० अंतर्गत ईडीने क्रिकेटपटू, अभिनेत्यांचे जबाब नोंदविले आहेत.
Web Summary : Cricketers and actors face potential asset seizure in an online betting money laundering case. The ED is investigating their involvement with the '1XBet' portal, alleging they used promotion earnings to acquire properties. Several celebrities, including Yuvraj Singh and Sonu Sood, have been questioned.
Web Summary : ऑनलाइन सट्टेबाजी मनी लॉन्ड्रिंग मामले में क्रिकेटरों और अभिनेताओं की संपत्ति जब्त हो सकती है। ईडी '1XBet' पोर्टल के साथ उनकी संलिप्तता की जांच कर रहा है, जिसमें आरोप है कि उन्होंने प्रचार आय का उपयोग संपत्तियां खरीदने के लिए किया। युवराज सिंह और सोनू सूद सहित कई हस्तियों से पूछताछ की गई है।