शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

आंतरराष्ट्रीय बाजारात 'या' ड्रग्जची क्रेझ वाढली; कुरिअरच्या मदतीने होतेय तस्करी; असं आहे मुंबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:13 IST

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये या ड्रग्जला बंदी आहे. त्यात मुंबईत हे ड्रग्ज तयार करून पाठविण्यात येत आहे.

मुंबई- थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एनसीबी अधिक अलर्ट झाली आहे. यातच, कोकेनप्रमाणेच घातक असलेले ॲम्फेटामाइन ड्रग्ज डोकेवर काढत असून त्यावर रोख लावण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची वाढती क्रेझ लक्षात घेता, हे ड्रग्ज मुंबईत तयार करून व्हाया कुरिअर ऑस्ट्रेलियासह विविध देशात पाठविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये या ड्रग्जला बंदी आहे. त्यात मुंबईत हे ड्रग्ज तयार करून पाठविण्यात येत आहे. हा प्रकार कुरिअर कंपनीआड सुरू असून यात मोठे रॅकेट सहभागी असल्याचा संशयही त्यांनी वर्तवला आहे. त्यानुसार, एनसीबीचे पथक अधिक तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात किलोमागे 5 कोटी रुपयांना या ड्रग्जची विक्री होत आहे. 

एनसीबीने गेले तीन दिवस ८ ठिकाणी सर्च ऑपरेशन करून केलेल्या कारवाईत १३ कोटी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी अटक केलेल्या परदेशी नागरिकाची अधिक चौकशी सुरू असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. 

कुरिअर कंपन्या रडारवरकुरिअर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात येतात. पहिल्यांदाच अशा प्रकारे तस्करीचे नवे फंडे समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे यात कुरिअर कंपन्यांचा काही सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSameer Wankhedeसमीर वानखेडेAustraliaआॅस्ट्रेलियाMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी