शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चुलत भाऊच निघाला बहिणीचा मारेकरी, 'या' कारणाने बेदम मारहाण करत केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:52 IST

महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येप्रकरणी तिचा चुलत भाऊ चंदन सिंह आणि त्याचा मित्र मनोजला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एका चुलत भावाने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमिया गावातील ही घटना असून मृत महिलेचं नाव ज्योति आहे. महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येप्रकरणी तिचा चुलत भाऊ चंदन सिंह आणि त्याचा मित्र मनोजला अटक केली आहे. चौकशीत चंदनने सांगितलं की, परिवाराची बदनामी होत असल्याने रागावून त्याने बहिणीची हत्या केली.

आरोपीनुसार, पतीच्या मृत्यूनंतर डबली ऊर्फ ज्योति माहेरीच राहत होती. तिच्या घरी अनेक लोकांचं येणंजाणं होतं. २४ तासांच्या आत केस सॉल्व्ह करत  पोलिसांनी आरोपीला मंगळवारी कोर्टात सादर करून तुरूंगात पाठवलं.

एसपी मनोज अवस्थी यांच्यानुसार, सोमवारी सकाळी अहमिया गावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात समोर आलं की, महिला त्याच गावातील राहणारी ज्योति आहे. तिचं लग्न १५ वर्षापूर्वी राजेंद्र नगरमध्ये झालं होतं आठ महिन्यांपूर्वी ज्योतिच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर ती माहेरी निघून आली. (हे पण वाचा : धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर)

दोघांची दोन मुले आजी-आजोबांकडे आहे. ज्योतिचा सांभाळ तिचा चुलत भाऊ चंदन सिंह करत होता. तीन जुलैला चंदन दारू प्यायला अड्ड्यावर गेला होता. तेव्हा कुणीतरी चंदनला टोमणा मारत ज्योतिबाबत अपशब्द काढला होता. यामुळे संतापलेल्या चंदनने तिच्या हत्येचा प्लॅन केला. त्याच रात्री जाऊन त्याने मित्रासोबत ज्योतिला बेदम मारहाण केली आणि तिचा जीव घेतला.

चंदनने तीन जुलैला हत्या केल्यावर मृतदेह घरातच लपून ठेवला होता. जेव्हा मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यांनी मृतदेह नेऊन रस्त्याच्या किनारी फेकला. बहिणीच्या हत्येप्रकरणी अटक झालेला चंदन याआधीही तुरूंगात जाऊन आला.

ज्योतिच्या पतीने का केली आत्महत्या?

पोलिसांनी सांगितलं की, ज्योतिचा पती तिच्या वागण्यामुळे परेशान होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा सांभाल पतीचे आई-वडील करतात. माहेरी परत आल्यावरही ज्योतिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. त्यामुळे तिच्या वागण्याला कंटाळून तिच्या चुलत भावाने तिची हत्या केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी