ठळक मुद्देकुटुंबाकडून हत्या लपवण्याचा प्रयत्न; शवविच्छेदन करण्यासही नकारपोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हत्येचा उलगडाप्रेमसंबंध मान्य नसल्यानं तीन गोळ्या झाडून मुलीची हत्या

मेरठ: कुटुंबाचा विरोध असूनही प्रेम संबंध ठेवल्यानं चुलत भावानं १९ वर्षीय बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे चुलत भावानं बहिणीच्या गुप्तांगावर गोळी झाडली. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलिसदेखील हादरले. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी हा खून लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलीस चौकशीतून सत्य समोर आलं. 

चुलत भावानं बहिणीवर तीन गोळा झाडल्यानंतर तिच्या कुटुंबानं तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी संशय आल्यानं रुग्णालय प्रशासनानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी मुलीनं चोरांना विरोध केल्यानं त्यांनी गोळ्या झाडून तिची हत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला.मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून दिली जाणारी माहिती न पटल्यानं पोलीस मुलीच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना रक्ताचे डाग दिसले. हे डाग पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर हाती आलेल्या शवविच्छेदन अहवालातून मुलीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली. मुलीच्या मांडीवर, गुप्तांगावर आणि पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करुन तिच्या चुलत भावावर गुन्हा दाखल केला. याशिवाय तिच्या कुटुंबीयांचीदेखील चौकशी केली. 'त्यांच्या घरात रक्ताचे बरेच डाग होते. ते पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत होतं. त्या ठिकाणी काही फुटलेल्या बांगड्यादेखील दिसल्या. कदाचित त्या मुलीनं प्रतिकार केला असावा,' अशी माहिती मेरठचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केल्यावर त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कुटुंबातल्या सदस्यांनी शवविच्छेदन करण्यासही नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पीडित तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाला या नात्याला विरोध होता. त्यामुळे तिच्या चुलत भावानं तिच्यावर गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे सर्व कुटुंबीयांच्या समोर हा प्रकार घडला.
 

Web Title: Cousin brother Shoots 19 Year Old Girl In Private Part Over Love Affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.