शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जमा रक्कमेच्या वाटपाचे नियोजन आराखडा सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:54 IST

डीएसके यांची आलिशान वाहने विकल्यानंतरचे पैसे आणि न्यायालयात जमा झालेले ६ कोटी ६५ लाख रुपये ठेवीदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे अ‍ॅड.श्रीकांत शिवदे यांनी केला होता. 

ठळक मुद्देया प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार क्लोजर रिपोर्टवर से सादर करण्यासाठी सरकार पक्षाला दोन आठवड्याची मुदत

पुणे : बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले ६ कोटी ६५ लाख रुपये आणि त्यांची महागडी वाहने विकल्यानंतर त्यातून जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल याचा आराखडा सादर करावा, असे आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी गुरुवारी दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना वगळण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवर आपले लेखी म्हणणे (से) सादर करण्यासाठी सरकार पक्षाला दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. बँक अधिकारांना गुन्ह्यांतून वगळण्यात यावे, असा अहवाल पोलिसांनी यापूर्वी सादर केला आहे. त्याविरोधात गुंतवणूकदाराच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यावर से दाखल करण्याचे आदेश न्यायालायाने मूळ फिर्यादी जितेंद्र नारायण मुळेकर याना दिला होता, त्यावर गुरुवारी युक्तिवाद होणार होता, मात्र से न मिळाल्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी ३ आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलानी केली होती. त्यानुसार २ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. सुनावणीसाठी डी.एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती, अनुराधा पुरंदरे आणि सई वांजपे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.डीएसके यांची आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांचा लिलाव करण्यात यावा. वाहने विकल्यानंर जमा झालेले पैसे आणि न्यायालयात जमा झालेले ६ कोटी ६५ लाख रुपये ठेवीदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे अ‍ॅड.श्रीकांत शिवदे यांनी केला होता. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालयMONEYपैसा