शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:15 IST

दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती.

कोरोना महामारीमुळे अनेकांचे उद्योग बंद पडल्याने पती-पत्नीला साऊथचा एक सिनेमा पाहून चोरी करण्याची आयडिया आली. दोघांनीही फिल्मी स्टाइल ज्वेलरीचं दुकान लुटण्याचा प्लॅन केला. हे दुकान लुटण्यासाठी दोघांनी खेळण्यातील बंदूक खरेदी केली. सगळं काही प्लॅननुसार होत होतं, पण ते दोघे चोरी करत असतानाच त्याचं गुपित उघड झालं.

अहमदाबादच्या कृष्णानगर भागात ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेल्यावर पती-पत्नी म्हणाले की, कोरोनामुळे दोघांची नोकरी गेली. घरातील आर्थिक स्थिती बिकट झाली होती. काय करावं काही कळत नव्हतं. अशात त्यांनी एक साऊथचा सिनेमा बघून चोरी करण्याचा प्लॅन केला. (हे पण वाचा : लग्नाच्या दिवशीच बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली नवरी, पोलीस स्टेशनमध्ये रडत बसला नवरदेव)

दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती. दुकानात शिरल्यावर त्यांनी स्टाफला धमकावणं सुरू केलं. दुकानातील स्टाफही भर दुपारी घडत असलेल्या या घटनेने घाबरले होते. (हे पण वाचा : रेपिस्ट पतीची हत्या करून मुलांसोबत मृतदेहाची लावली होती विल्हेवाट, तरी महिलेची कोर्टाने शिक्षा केली माफ)

मात्र, कामगारांनी बहादुरी दाखवत हा चोरीचा प्लॅन हाणून पाडला. तेव्हाच दाम्पत्याचं गुपित उघड झालं. त्यानंतर दोघेही माफी मागत होते. त्यानंतर चोरीची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहो़चले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. पतीचं नाव भरत गोयल आणि पत्नीचं नाव योगिता आहे. पोलिसांनी सांगितलं की, भरत गोयल शिवणकाम करत होता, पण कोरोनामुळे व्यापार बंद झाला. त्यामुळे त्यांच्याकडे घर चालवण्यासाठी पैसे नव्हते.

दरम्यान त्यांनी टीव्हीवर एक सिनेमा पाहिला आणि त्यातूनच त्यांना चोरी करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं. बाजारातून खेळण्यातील बंदूक आणली आणि एक नकली हातोडीही आणली. पकडले गेल्यावर दोघेही आपली मजबुरी सांगत सोडण्याची विनंती करत होते. पोलीस म्हणाले की, पती-पत्नी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादCrime Newsगुन्हेगारी