शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार, पत्नी गंभीर; दोघांही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 20:55 IST2021-06-19T20:51:57+5:302021-06-19T20:55:11+5:30

तालुक्यातील शिवडे येथील ठाकरवाडी भागात राहणाऱ्या युवकाने दाम्पत्यावर गोळीबार केला.

couple shot at shivde shivara | शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार, पत्नी गंभीर; दोघांही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार, पत्नी गंभीर; दोघांही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील शिवडे येथील ठाकरवाडी भागात राहणाऱ्या युवकाने दाम्पत्यावर गोळीबार केला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून त्यात पत्नीची प्रकृती गंभीर आहे. दोघाही जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवडे गावात मराठी शाळेजवळ  गोळीबार केल्यानंतर संशयित युवक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिवडे गावात ठाकरवाडी भागात राहणाºया रावसाहेब नामदेव कातोरे (३७) याचे भावजईसोबत संबंध असल्याच्या संशयातून अशोक नामदेव मेंगाळ या संशयित युवकाने त्यांच्यावर बंदूकीतून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात रावसाहेब कातोरे याच्या उजव्या हाताला गोळी लागून तीच गोळी त्याची पत्नी मनीषा रावसाहेब कातोरे हिच्या पोटात घुसली. यात मनीषा कातोरे गंभीर जखमी झाली. दोघांही जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळीबारानंतर संशयित अशोक नामदेव मेंगाळ हा फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्यासह सिन्नर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे या वरिष्ठांनी भेटी देऊन तपासकामी सूचना केल्या. गोळीबार करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झााले नाही.  संशयित अशोक नामदेव मेंगाळ याच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करीत आहेत.
 

Web Title: couple shot at shivde shivara