शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जादूटोण्याच्या संशयावरून आदिवासी दाम्पत्याचा खून, आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:51 IST

औढे (ता. खेड) येथे जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. या आदिवासी पती-पत्नीवर झोपेतच सपासप वार करण्यात आले.

पाईट : औढे (ता. खेड) येथे जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. या आदिवासी पती-पत्नीवर झोपेतच सपासप वार करण्यात आले. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.नवसू पुणाजी वाघमारे (वय ५५), लीलाबाई सुदाम मुकणे (वय ५०) अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत लीलाबाईचा मुलगा राजू सुदाम मुकणे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : औढे येथील गायमाळवस्तीजवळील महारदरा परिसरात कोंडिबा देवजी गायकवाड यांच्या मालकीच्या रानात हे दाम्पत्य गवताच्या झोपडीमध्ये राहत होते. बुधवारी घरामध्ये झोपलेले असतानाच रात्री ११ च्या सुमारास धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.त्यांची झोपडी निर्जन ठिकाणी आहे. त्यामुळे या हत्याकांडाची माहिती सकाळपर्यंत उजेडातच आलेली नव्हती. सकाळी आठच्या सुमारास मारुती शंकर शिंदे दूध घालण्यासाठी जात असताना त्यांना वाघमारे यांचा मृतदेह अंथरुणामध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. लीलाबार्इंचा मृतदेह औढे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विवस्त्रावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ हा प्रकार पोलीसपाटील विलास बारकू शिंदे व उपसरपंच धोंडिभाऊ शिंदे यांना कळविला. याबाबत खेड पोलिसांना तत्काळ माहिती कळविण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धावघेत पंचनामा केला. दोघांच्याही डोक्यात, हातावर, तसेच पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. नवसू वाघमारे यांच्याबरोबर लीलाबार्इंचा दुसरा विवाह झालेला आहे. दुसरा विवाह होऊनही त्या पहिल्या पतीचेच नाव लावत होत्या.लीलाबाई या मांत्रिक होत्या. त्यापूर्वी कोहिंडे (ता. खेड) येथे राहत होत्या. येथील काही लोकांना त्या जादूटोणा करतात, याचा राग होता. यावरून त्यांना गावामध्ये ठराविक लोकांकडून सतत शिवीगाळ केली जात होती. त्याला कंटाळून त्यांनी गावच बदलले होते. राजू याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.आरोपी ताब्यातफिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे पोलिसांनी जयतु चिंधू बोरकर, लक्ष्मण चिंधू बोरकर व बबन एकनाथ मुकने यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी लीलाबाई जादूटोणा करते तसेच तिच्यामुळे गावातील मुले मेल्याच्या समजातून सतत शिवीगाळ करायचे. याच कारणाहून त्यांनी आई व सावत्र वडील यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे