Coronavirus: बायको कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच रेल्वेत असणाऱ्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:00 PM2021-04-26T22:00:22+5:302021-04-26T22:02:29+5:30

इतकचं नाही तर बायकोची हत्या करून नवऱ्यानेही राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

Coronavirus:Patna railways station master kills corona positive wife jumps off fourth floor to death | Coronavirus: बायको कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच रेल्वेत असणाऱ्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

Coronavirus: बायको कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच रेल्वेत असणाऱ्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल

Next
ठळक मुद्देपत्नी कोरोना पॉझिटिव्ह होती. यावरून पती चिंतेत होता. त्यानंतर ही घटना घडली रेल्वे स्टेशन मास्टरची पत्नी कोरोना पीडित होती. यावरून दोघा नवरा बायकोमध्ये भांडण झालंस्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ ते घटनास्थळी पोहचले

पटना – बिहारमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका रेल्वे स्टेशन मास्टरने स्वत:च्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येमागे जे कारण समोर आलंय ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्नी कोरोना पीडित असल्याने पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे.

इतकचं नाही तर बायकोची हत्या करून नवऱ्यानेही राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना पटनाच्या पत्रकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ओम रेसिडेन्स येथे घडली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्नी कोरोना पॉझिटिव्ह होती. यावरून पती चिंतेत होता. त्यानंतर ही घटना घडली. सुरुवातीच्या तपासात पती अतुल लाल हा पटना जंक्शन येथे रेल्वेत नोकरी करत होता. उपनिरीक्षक रविंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन मास्टरची पत्नी कोरोना पीडित होती. यावरून दोघा नवरा बायकोमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात अतुल लालने पत्नी तुलिकाचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर अतुल लालने इमारतीतील चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यात अतुल लाल याचाही मृत्यू झाला. सध्या पोलीस संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.  

Web Title: Coronavirus:Patna railways station master kills corona positive wife jumps off fourth floor to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.