शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:12 IST

Coronavirus : शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष

ठळक मुद्दे नियमानुसार सर्व होम क्वारंटाईन, परिसरातील चहावाल्याला झाला होता कोरोना दिलासादायक म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तेथे तैनात १७० पोलीस सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दिलासादायक म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या सर्व पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं होते. मातोश्री परिसरात तैनात काही पोलीस सुरक्षारक्षक या चहावाल्याकडे चहा प्यायचे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेथे तैनात १७० पोलीस अधिका-यांची व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, नियमानुसार या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.मुंबईतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना सतर्कतेचे आदेश देण्याता आले आहेत. यावेळी पोलीस वसाहतींकडे लक्ष देण्यात येत आहे. शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यातील 8 वसाहती या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि ५5 वसाहती या पोलीस अधिका-यांच्या आहेत. यापैकी २ वसाहती पूर्ण सील केल्या आहेत. या १५ वसाहतींमध्ये एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी - कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या