शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 13:45 IST

Coronavirus : विटेने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक विजय कुमार यांच्या डोक्याला अनेक टाके डॉक्टरांना घालावे लागले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजय कुमार आपल्या कुटुंबासमवेत हर्ष विहारच्या बी-ब्लॉकमध्ये राहतो आणि गेल्या तीन वर्षांपासून जीटीबी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाच्या डोक्याला जखम झाली. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या जीटीबी रूग्णालयात सुरक्षा रक्षक (गार्ड) म्हणून काम करणारे विजय कुमार यांच्यावर त्याच्या शेजाऱ्याने विटांनी हल्ला करून जखमी केले आहे. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, उत्तर - पूर्व दिल्लीतील हर्ष विहार येथे राहणार्‍या जीटीबी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्या शेजारी राहणाऱ्या विकासने कोरोना व्हायरस फैलाव करण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केली. त्याचवेळी त्याने सुरक्षा रक्षकाला दगडाने मारहाण करून जखमी केले. 

विटेने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक विजय कुमार यांच्या डोक्याला अनेक टाके डॉक्टरांना घालावे लागले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (उत्तर-पूर्व) वेदप्रकाश सूर्य यांनी सांगितले की, २४ वर्षीय संशयित विकास याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विजय कुमार आपल्या कुटुंबासमवेत हर्ष विहारच्या बी-ब्लॉकमध्ये राहतो आणि गेल्या तीन वर्षांपासून जीटीबी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी विजय कुमार आपल्या गच्चीवर व्यायाम करत असताना हा हल्ला करण्यात आला. त्याच्या गच्चीचा भाग शेजारी राहणाऱ्या विकासच्या घराशी जोडलेला आहे. विकास कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विकासने त्याला कोठे काम करता असे विचारले. कुमार म्हणाले, मी जीटीबी हॉस्पिटलमध्ये गार्ड म्हणून काम करतो हे सांगितल्यावर आरोपी विकासने सांगितले की,  तुम्ही 'कोरोना हॉस्पिटल'मध्ये काम करता तर तुम्ही हा विषाणू आजूबाजूला पसरवाल. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि हे प्रकरण इतके वाढले की, विकासने त्याच्या काही मित्रांसह सुरक्षारक्षकाच्या घरात प्रवेश केला आणि मारहाण केली. त्याचवेळी त्याने विजय कुमारच्या डोक्यावर वीट घातली. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाच्या डोक्याला जखम झाली. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसArrestअटक