शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 7:34 PM

CoronaVirus Lockdown : होटगी गावातील घटना : आईला औषध आणण्यासाठी जाताना घडला प्रकार

ठळक मुद्देही मारहाण रविवारी सायंकाळी 6.30 वाजता झाली. हरिकृष्ण चोरमुले हे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत.साप्ताहिक सुट्टीनिमित्त हरिकृष्ण चोरमुले हे होटगी येथील गावच्या घरी गेले होते.

सोलापूर : आईला औषध घेऊन येण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला होटगी येथे आडवण्यात आले. पोलीस आहे असे सांगत असतानाही एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी हरिकृष्ण भागवत चोरमुले (वय 35 रा. होटगी स्टेशन ता. दक्षिण सोलापूर)  हे जखमी झाले आहेत. ही मारहाण रविवारी सायंकाळी 6.30 वाजता झाली.

हरिकृष्ण चोरमुले हे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. साप्ताहिक सुट्टीनिमित्त हरिकृष्ण चोरमुले हे होटगी येथील गावच्या घरी गेले होते. घरी आई आजारी असल्याने तिला औषध आणण्यासाठी सायंकाळी घराच्या बाहेर पडले. 

 

मोटारसायकलवरून ते होटगी गावाच्या कॉर्नर जवळ आले असता, तेथे उभे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आडवले. हरिकृष्ण चोरमुले यांना अधिकाऱ्याने काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हां पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांनी मी पोलीस आहे. असे सांगत असतानाही त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत हरिकृष्ण चोरमुले हे जखमी झाले, ते खाली पडले. त्यांना जागेवर सोडुन अधिकारी गाडीत बसुन निघुन गेले.पोलीस अधिक्षक यांच्याकडे दिली तक्रार : हरिकृष्ण चोरमुलेमी पोलीस आई असे सांगुनही अधिकारी ऐकत नव्हते, त्यांनी काठीने बेदम मारहाण केली. जा तुला कुठे जायच ते जा माझ्यावर केस कर असे म्हणत मला मारहाण करून निघुन गेले. माझ्या हाताचे तीन बोेटे फ्रॅक्चर झाली आहेत. याची फिर्याद देण्यासाठी मी वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी तक्रार घेतली नाही. या प्रकरणी मी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांनी लोकमतशी बोलताना दिली.सिव्हिल पोलीस चौकीत नोंद...जखमी आवस्थेत पोलीस कर्मचारी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल झाले. सिव्हिल पोलीस चौकीत पोलीस उपअधिक्षक (डीवायएसपी) संतोष गायकवाड यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapurसोलापूरmedicinesऔषधं