शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 17:20 IST

Coronavirus Lockdown : एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पोलिसांना गावप्रमुखांकडून याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देदक्खिन पंडोवा गावात एका मशिदीत लोकांना नमाज अदा केल्याची माहिती मिळाल्यानंतर नाओबिचा पोलिस चौकी प्रभारी विश्वजित नाथ यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पथक दाखल झाले होते.अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या पथकास इमामसह 12 जण तेथे पोचल्यावर मशिदीच्या आत सापडले.

लखीमपूर - आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील एका गावात धार्मिक सभा रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवरदगडफेक झाल्याने चार सुरक्षा कर्मचार्‍यांसह जवळपास पाच जण जखमी झाले. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी रात्री घडली. दक्खिन पंडोवा गावात एका मशिदीत लोकांना नमाज अदा केल्याची माहिती मिळाल्यानंतर नाओबिचा पोलिस चौकी प्रभारी विश्वजित नाथ यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पथक दाखल झाले होते. एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पोलिसांना गावप्रमुखांकडून याची माहिती मिळाली. 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या पथकास इमामसह 12 जण तेथे पोचल्यावर मशिदीच्या आत सापडले. त्यांनी इमाम आणि इतरांना एकत्र न होण्याची विनंती केली आणि त्यांना सोशल डिस्टंसिंगच्या असलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. या पथकाने आवारात प्रवेश करण्यापूर्वी मशिदीच्या शेजारी चालू असलेला एक छोटासा बाजार बंद केला. पथक मशिदीचा परिसर सोडण्याच्या तयारीत असताना जोरदार दगडफेक सुरू झाली. या दरम्यान चार पोलीस व गावप्रमुख जखमी झाले.

पोलिसांचे वाहनाचेही नुकसान झाले आणि विंडस्क्रीन व साइड विंडो तुटल्या. जखमींमध्ये नाथ, आसाम पोलिस शिपाई करुणा बुजारबरुआ , सीआयएसएफचे कर्मचारी भूमिहार नरजारी आणि सरोज यादव आणि गाव प्रमुख अब्दुल जलील फरशी हे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याच्या दुखापती गंभीर नाहीत.   

टॅग्स :stone peltingदगडफेकPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या