शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown : टीव्ही अँकरविरोधात गुन्हा दाखल, रिसॉर्टवर गर्दी जमवून थाटला लग्न सोहळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 19:28 IST

Coronavirus Lockdown : लॉकडाऊनचे उल्लंघन करत अँकरने त्याच्या रिसॉर्टमध्ये पाहुण्यांना बोलावून लग्न केले असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देकर्नाटकमधील कन्नड टीव्ही अँकरने लॉकडाऊनचे उल्लंघनाबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांचा मुलगा निखिलच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

बंगळुरू -  देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणाऱ्या या कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी सर्व लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे, परंतु अनेक ठिकाणी लॉकडाउन उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सरकारच्या निर्देशानुसार एका ठिकाणी 4 हून अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. परंतु कर्नाटकमधील कन्नड टीव्ही अँकरने लॉकडाऊनचे उल्लंघनाबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करत अँकरने त्याच्या रिसॉर्टमध्ये पाहुण्यांना बोलावून लग्न केले असल्याचा आरोप आहे.माध्यमांच्या वृत्तानुसार, अँकरने हे लग्न आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. अशा वेळी लॉकडाऊन उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा त्रास वाढला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण आपापल्या घरी कैद झाले आहेत. यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांचा मुलगा निखिलच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे लग्नही लॉकडाऊनदरम्यान झाले. या लग्नात त्यांचे नातेवाईक सामील होते. यानंतर सोशल मीडियावरही या लग्नावर टीका झाली होती. लॉकडाऊनने लग्नाला व्हीव्हीआयपी सूट देण्याबाबत चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी हे स्पष्ट केले की या लग्नात कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन उल्लंघन झाले नाही. 

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन आहे. सर्व लोक 3 मे पर्यंत आपापल्या घरात कैदेत आहेत. अद्याप या संसर्गावर कोणताही इलाज नाही. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा ६०० च्या वर गेला आहे. त्याचवेळी, संसर्ग झालेल्यांची संख्या १९,००० पेक्षा जास्त झाली आहे. दररोज हा आकडा वाढतच आहे. सध्या देश कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे.

टॅग्स :marriageलग्नKarnatakकर्नाटकPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या