शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Coronavirus : अखेर मौलाना साद यांचा ठावठिकाणा लागला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 14:34 IST

Coronavirus : क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ते पोलिसांच्या तपासाला सहकार्य करतील. 

ठळक मुद्दे याआधी तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती.दिल्ली पोलीस मौलाना सादचा क्वारंटाईनचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करणार आहेत.

नवी दिल्लीदिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिगी जमातप्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार झालेल्या मौलाना मोहम्मद साद यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची पथकं तयार करण्यात आली होती. मौलाना साद हे हा सध्या त्याच्या दिल्लीच्या झाकीर नगर भागातील निवासस्थानी क्वारंटाईन असल्याची माहिती मिळत आहे. साद यांचे वकील तौसीफ खान यांनी सांगितले की, साद सध्या क्वारंटाईन आहेत. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ते पोलिसांच्या तपासाला सहकार्य करतील. 

याआधी तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. दरम्यान, मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एका दिवसापूर्वी मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात त्यांनी आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे. क्राईम ब्रँचच्या नोटिसीला उत्तर देत मौलाना साद म्हणाले होते की, मी स्वत: क्वारंटाईनमध्ये आहे. सध्या मरकज बंद आहे, जेव्हा मरकज उघडेल तेव्हा बाकी प्रश्नांची उत्तरे देईन.   

 क्राईम ब्रँचकडून पाठवलेल्या नोटिसद्वारे संस्थेचा पूर्ण पत्ता, नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती, संस्थेतील कर्मचाऱ्यांची संपूर्ण महिती ज्यात त्यांचा घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक आहे, मरकजच्या व्यवस्थापनाशी जोडलेल्या लोकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. त्याचबरोबर ही सर्व सामील लोकं कधीपासून मरकजशी जोडलेले आहेत.

तसेच मरकजची मागील 3 वर्षांच्या आयकराची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि एका वर्षाची बँक स्टेटमेंटची माहिती मागवली आहे. 1 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत मरकजशी संबंधीत सर्व धार्मिक कार्यक्रमाची माहिती देखील मागितली आहे. विचारण्यात आले आहे की, मरकजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे का आणि जर लावले आहेत तर ते कुठे कुठे लावण्यात आले आहेत.  सूत्रांच्या माहितीनुसार, ठावठिकाणा समजला असला तरी दिल्ली पोलीस मात्र लगेचच त्याची चौकशी करण्याची किंवा त्याला ताब्यात घेण्याची घाई करणार नाहीत. जमातशी निगडीत अनेक लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मौलाना साद स्वत:देखील करोनाबाधित असू शकतात असा संशय आहे. त्यामुळे, दिल्ली पोलीस मौलाना सादचा क्वारंटाईनचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करणार आहेत.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने मौलाना साद यांना पोलीस किंवा प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांचा जमाव जमवण्यासाठी कधी परवानगी घेतली होती का, परवानगी मिळाल्याबाबत असलेली कागदपत्रे, 12 मार्चनंतर मरकजला आलेल्या सर्व लोकांची संपूर्ण माहिती द्या, ज्यात परदेशी आणि भारतीयांचा समावेश आहे, असे प्रश्न विचारले आहेत. मरकजमध्ये लोकांची गर्दी जमा केल्याप्रकरणी मौलाना सादसह ६ जणांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीPoliceपोलिस