शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

coronavirus: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट एफडीए कडून उध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:59 IST

मुंबई -  कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील ...

मुंबई -  कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करून रेमडेसिविरचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.  

सदर प्रकारात गुंतलेल्या एका व्यक्तिचा मोबाइल क्रमांक  सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांना प्राप्त झाला होता. Remdesivir Injection चा काळाबाजार करून अवैधपणे विक्री करणारी मोठी टोळी मुंबई व आसपासच्या परिसरात सक्रिय असल्याच्या शक्यतेवरून  सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांच्या नियंत्रणा खाली गोपनीय कारवाई रचण्यात आली. सदर मोबाईल क्रमांकावर  औषधांची मागणी केली असता या औषधाची प्रत्येक व्हायल किंमत रुपये तीस हजार अशा दराने विक्री करण्याचे मान्य केले. या औषधाची छापील किंमत पाच हजार चारशे असे असते वेळी त्यांनी 30000 किंमत असल्याचे आढळले.

 अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिनांक 18 जुलै 2020 रोजी बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व विकास दुबे व राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री कण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करतांना रंगेहात पकडले. पुढील तपासात COVIFOR (Remdesivir Injection) या औषधाच्या 06 व्हायल चा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाच्या काळाबाजार करून विक्रीच्या साखळी मध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे,  गुरविंदर सिंग व सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले. या सर्व व्यक्तिंकडे चौकशी करून दोन ठिकाणाहून 12 व सापळ्या दरम्यान 1 अश्या एकूण 13 Remdesivir Injections चा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला.या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले  सर्व व्यक्ती औषधे दुकानदाराकडे सेल्समन  अथवा औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर औषध विक्री करते रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची मागणी विक्री करते वेळी केली नाही. 

प्रकरणाचे गांभिर्य व व्याप्ती बघता गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांच्यासमवेत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यांमध्ये श्री नांदेकर औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन,  माननीय श्री राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्रीवर यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना च्या अनुषंगाने श्री अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  श्री सुनील भारद्वाज सहआयुक्त दक्षता,  गहाणे सह आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या दक्षता विभाग, बृहन्मुंबई विभाग व गुन्हा शाखा घाटकोपर युनिट क्रमांक 7 यांनी संयुक्तपणे केली.सदर कारवाईवेळी श्री सुनील भारद्वाज सह आयुक्त दक्षता यांनी स्वतः हजर राहून योग्य ते मार्गदर्शन व चौकशी दिशा दिली.  या कारवाईत सहाय्यक आयुक्त श्री झाडबुके, सहाय्यक आयुक्त डॉ. तिरपुडे, औषध निरीक्षक श्री नांदेकर, औषध निरीक्षक गुप्तवार्ता श्री कोंडीबा गादेवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तावडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी भाग घेतला.  रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त दक्षता श्री सुनील भारद्वाज यांनी केले आहे।

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFDAएफडीएCrime Newsगुन्हेगारी