शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 20:25 IST

Coronavirus : ५३५ व्यक्तींना अटक

ठळक मुद्दे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला . ७९,९०१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

मुंबई - राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ८१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५९ घटना घडल्या. त्यात ५३५ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.     

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत  कलम १८८ नुसार  ८१,०६३  गुन्हे नोंद झाले असून १६,५४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ८५ लाख ५०हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

कुख्यात एमडी ड्रग तस्कर आबूखानचा आत्महत्येचा प्रयत्न

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने पोलिसांवर केला हल्ला 

१०० नंबरवर भडिमार     

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला . ७९,९०१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण १,५५,०७६ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.      

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ११०७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४९,११३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांसाठी दवाखाने राखीवकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने  मुंबईतील ३ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. १४पोलीस अधिकारी व ८५ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. ज्यात एकूण ४७८५ हजार रिलिफ कॅम्प आहेत. जवळपास ४,९७,२५६  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊन च्या काळातील सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्र