शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:41 IST

Coronavirus : राज्य पोलीस दलातील २९१ लढवय्या पोलिसांची ही कहाणी आहे.

ठळक मुद्देडॉक्टर, नर्सच्याबरोबर लढत असताना या खाकी वर्दीवाल्यानाही या विषाणूची लागण झाली.मात्र त्याला न घाबरता धैर्याने मुकाबला केला.योग्य औषधोपचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या भयंकर किटाणूला त्यांनी परतवून लावले आहे.

मुंबई - राज्यातील कोरोनाचे महासंकट परतविण्यासाठी डॉक्टर, नर्सच्याबरोबर लढत असताना या खाकी वर्दीवाल्यानाही या विषाणूची लागण झाली.मात्र त्याला न घाबरता धैर्याने मुकाबला केला.थोड्या दिवसांच्या उपचारानंतर त्याच्यावर यशस्वी मात देत ते घरी परतले आहेत.

राज्य पोलीस दलातील २९१ लढवय्या पोलिसांची ही कहाणी आहे. योग्य औषधोपचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या भयंकर किटाणूला त्यांनी परतवून लावले आहे. त्यांच्याप्रमाणेच  त्याचे आणखी काही सहकारीही लवकरच बरे होऊन घरी परतणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांमध्ये ३४ अधिकारी आणि २५७ अंमलदाराचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांशजण मुंबई पोलीस दलातील आहेत. 

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना त्याचा संसर्ग पोलिसांनाही मोठया प्रमाणात होत आहे.आतापर्यत एका अधिकाऱ्यासह अकराजणाचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर पोलीस दलातील विविध घटकात कार्यरत असलेल्या तब्बल १२७५ जणांना त्याची लागण झाली आहे.त्यामध्ये १३१ अधिकारी आणि ११४२ अंमलदाराचा समावेश आहे.त्यांना ते कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये त्यापैकी ३४ अधिकारी आणि २९१ अंमलदार योग्य उपचारामुळे कोविड-१० पासून पूर्णपणे बरे झाले आहेत.त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक औषधे देऊन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला ९७१ जण उपचार घेत आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती सुधारत असून काहींचा उपचारानंतरचा पहिला  अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र आणखी दोन टप्यात चाचणी घेतली जाणार असून त्यामध्ये तसाच अहवाल आल्यास तेही  कोरोनापासून  मुक्त झाल्याचे जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांनाही टप्याटप्याने घरी सोडण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

 

नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

'त्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करा'आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी बंदोबस्तात जुंपलेल्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या उपचाराबाबत अजूनही समस्या आहेत. रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. विविध कारणे सांगत एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे, तेथून तिसरीकडे रुग्णाची पाठवणी केली जात असल्याची परिस्थिती आहे, एखाद्या पोलीस उपायुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या  अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच रुग्णालयांचे प्रशासन नमते घेऊन रुग्णाला अडमिट करून घेते,मात्र प्रत्येकवेळी अंमलदाराना वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होत नाहीत. अशा प्रकारामुळेच शाहूनगर पोलीस ठाण्यातील तरुण अधिकाऱ्याचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.त्यामुळे अडमिट करण्यास मुद्दामहून टाळाटाळ करणाऱ्या अशा रुग्णालयाच्या  प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त मागणी पोलीस वर्तुळातून होत आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई