कोरोना योद्धा महिला डॉक्टरने सोसायटीत राहू नये; शिवीगाळ करत शेजाऱ्यांची हीन वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:53 PM2020-05-15T22:53:54+5:302020-05-15T22:56:32+5:30

महिला डॉक्टरने आरोपी मनीषला समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आता ती पूर्णपणे ठीक आहेत.

Corona warrior female doctors should not remain in society; Negative treatment of neighbors by swearing | कोरोना योद्धा महिला डॉक्टरने सोसायटीत राहू नये; शिवीगाळ करत शेजाऱ्यांची हीन वागणूक

कोरोना योद्धा महिला डॉक्टरने सोसायटीत राहू नये; शिवीगाळ करत शेजाऱ्यांची हीन वागणूक

Next
ठळक मुद्दे अरुणा आसफ अली रुग्णालयात काम करते आहेत. या घटनेची माहिती मिळताच वसंतकुंज पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला घराबाहेर काढले.

दिल्लीच्या उच्चभ्रू  भागात वसंतकुंज येथे राहणाऱ्या महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. महिला डॉक्टरांना शिवीगाळ केल्याबद्दल दिल्लीपोलिसांनी मनिष नावाच्या व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ३४२ आणि ५०९  अन्वये एफआयआर दाखल केला आहे. आरोपी मनीष हा महिला डॉक्टरच्या शेजारी राहतो.


 या महिलेला डॉक्टर ड्युटीदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यानंतर तिला  वाईएमसीए आइसोलेशन सेंटर क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जेव्हा उपचारानंतर महिला डॉक्टर घरी परत आले तेव्हा शेजारच्या लोकांना कोरोना विषाणूची भीती वाटू लागली. यासंदर्भात मनीष यांनी महिला डॉक्टरांना सोसायटीत राहू नका असे सांगितले.

अरुणा आसफ अली रुग्णालयात काम करते आहेत. महिला डॉक्टर सांगते की, जेव्हा ती परत आली, तेव्हा सोसायटीमध्ये राहणारा मनीष जोरात ओरडत गेटजवळ आला आणि म्हणाला की, तू आता इथे राहू शकत नाही. दरम्यान, महिला डॉक्टरने आरोपी मनीषला समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आता ती पूर्णपणे ठीक आहेत.

मात्र, मनीष ऐकण्यास तयार नव्हता आणि घराबाहेर येऊ नये म्हणून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केले. डॉक्टर म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर रुग्णवाहिका त्याला क्वारंटाईन केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आली तेव्हा सोसायटीच्या लोकांनीही माझा व्हिडिओ बनविला. डॉक्टरांनी सांगितले की, ती या समाजात एकटीच राहते, म्हणून तिला भीती वाटली.

यानंतर त्यांनी या घटनेची माहिती रुग्णालयाच्या प्रमुखांना दिली, त्यानंतर रुग्णालयाच्या प्रमुखांनी पोलिसांना बोलावून मदतीची विनंती केली. या घटनेची माहिती मिळताच वसंतकुंज पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला घराबाहेर काढले. डॉक्टर अरुणा असफ अली रुग्णालयात दाखल आहेत. ती वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना संशयितांचे नमुने गोळा करीत असे. महिला डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, तिला ज्या प्रकारची वागणूक दिली गेली त्यापासून तिला भीती वाटली. तिचे कुटुंब देशाबाहेर राहते.

भारत नको! मुंबईच्या तुरुंगात उंदीर, किडे; घोटाळेबाज नीरव मोदीचा कांगावा

 

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

 

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

 

Web Title: Corona warrior female doctors should not remain in society; Negative treatment of neighbors by swearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.