मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:20 PM2020-06-22T13:20:05+5:302020-06-22T13:20:20+5:30

पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, मालाड पश्चिम येथील एका क्वारटाईन सेंटरमध्ये मे महिन्यापासून एक कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले होते.

Corona poses positively with a young woman in the quarantine center | मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, पोलिसात गुन्हा दाखल

Next

मुंबई - राजधानी मुंबईच्या मालाड पश्चिममध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड करण्याची आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात 20 जून रोजी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने स्वत:ला बीएमसीचा कर्मचारी असल्याचे सांगितले आहे. 

पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, मालाड पश्चिम येथील एका क्वारटाईन सेंटरमध्ये मे महिन्यापासून एक कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले होते. 30 मे रोजी या कुटुंबातील सर्वच सदस्य आपल्या घरी पाठविण्यात आले. मात्र, 13 जून रोजी कल्पेश नामक व्यक्तीने बीएमसी कर्मचारी असल्याचे सांगत, त्या कुटुंबातील युवती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कुटुंबातील सदस्यांना फोनवरुन सांगितले. तसेच, संबंधित तरुणीला क्वारंटाईन सेंटरमध्ये येण्यास सांगितले. त्यामुळे या तरुणीला तिच्या वडिलांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणून सोडले. त्यावेळी, अमित तटकरे नावाच्या व्यक्तीने तिच्या रुममध्ये जाऊन ती कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सांगितले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच, उद्या सकाळी तुला घरी सोडू, असेही तो म्हणाला. 

दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांशी अश्लील चाळे करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यात उत्तराखंड येथे एका पोलीस शिपायानेच नवविवाहित महिलेवर अतिप्रसंग केला होता. उधमसिंग नगरच्या किच्छा विधानसभेच्या पुलभट्टा क्षेत्रातील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्या पोलीस शिपायावर कारवाई केली होती. 
 

Web Title: Corona poses positively with a young woman in the quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.