शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधीत रुग्णाची आत्महत्या, आयसोलेशन वॉर्डाच्या बाथरुममध्ये लावला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:54 IST

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. यामुळे आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील देव्हाडा बुज. येथील ५० वर्षीय व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षण असल्याने भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.

भंडारा : कोरोनाबाधीत एका ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. तो बाथरुममध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तुमसर तालुक्यातील देव्हाडा बुज. येथील ५० वर्षीय व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षण असल्याने भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तो रुग्णालयात दाखल झाला तेव्हापासून तणावात असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी कोरोना वॉर्डातील एक व्यक्ती बाथरुमला गेले असता त्याला ५० वर्षीय व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. यामुळे आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाने महिलेचा मृत्यूभंडारा तालुक्यातील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत मृतांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही अलीकडे वाढ होत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस