शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नक्षल दहशतीच्या विरोधात काढली संविधान तिरंगा यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 8:48 PM

नागरिकांचा सहभाग : आलापल्लीवरून लाहेरीपर्यंत फिरला भलामोठा तिरंगा

ठळक मुद्देभल्यामोठ्या तिरंग्यासह निघालेल्या या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच निरापराध्यांचे बळी घेऊन दहशत पसरविली जाते. यावेळी तिरंगा खांद्यावर घेऊन लोकबिरादरी शाळेचे विद्यार्थी सोबत होते.

भामरागड (गडचिरोली) : लोकशाही मार्गाने चालणारे सरकार आणि संविधानानुसार चालणाऱ्या व्यवहाराला विरोधी करत नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच निरापराध्यांचे बळी घेऊन दहशत पसरविली जाते. परंतु, त्याला न जुमानता लोकशाहीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने जनसंघर्ष समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार २६ जानेवरीला आलापल्ली ते भामरागड आणि पुढे छत्तीसगड सीमेकडील लाहेरीपर्यंत संविधान तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भल्यामोठ्या तिरंग्यासह निघालेल्या या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्यासह त्यांचे सहकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, रितेश बडवाईक, डॉ.श्रुती आष्टनकर, उडान फाऊंडेशनचे रमेश दलाई, रवी नीलकुद्री, प्रशांत मित्रावार, तसेच जनसंघर्ष समितीचे सदस्य संदेश लोधी, पंकज दुर्वे, अभिशेक सावरकर, गोलू ठाकरे, बरखा बडवाईक, प्रशांत शेंडे, रोशन ताईकर, शैलेश बामुलकर, आयुष्य दुबे, नीलेश गोमिसे, आशिष चौधरी, अभिजीत डायघने, महेश ढोबळे, मारूती मज्जी आदी सहभागी झाले होते.

भामरगडला पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तिरंगा खांद्यावर घेऊन लोकबिरादरी शाळेचे विद्यार्थी सोबत होते. येथील बाजार चौक येथे सकाळी ९ वाजता जनसंघर्ष समितीच्या वतीने नागरिकांच्या उपस्थितीत संविधान पुस्तिका व तिरंगा पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक राष्ट्रगीत झाले. त्यानंतर संविधानाचे अधिकार व कर्तव्य याचे सामूहिक वाचन करून ही तिरंगा यात्रा लाहेरीकडे रवाना झाली.दरवर्षी घेणार कार्यक्रमदेशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक जण हुतात्मा झाले. पण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही स्वातंत्र्य कोसो दूर असल्यासारखे भयावह चित्र आहे. नक्षलवादी चळवळीत देशाचे अतोनात नुकसान होत असताना आपण एक व्यक्ती म्हणून काहीही करू शकत नाही का? की फक्त शासकीय यंत्रणा, पोलिसांचेच ते काम आहे, असे म्हणून गप्प बसणार? देशाच्या सीमेवर व देशाअंतर्गत आपल्या जवानांसोबत कायम उभे आहोत याची जाणीव वेळोवेळी त्यांना करून देण्याच्या हेतूने भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात जाऊन तेथे तैनात सुरक्षा दल आणि स्थानिक रहिवाशांसोबत प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र्य दिवस साजरा करणार असल्याचे जनसंघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीRepublic Dayप्रजासत्ताक दिनGadchiroliगडचिरोली