शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत काँग्रेस आमदाराच्या मुलाचा पोलिसांच्या टीमवर हल्ला; 3 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:14 IST

Crime News : कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या टीमवर दारूच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. फैयाज असं नसीर अहमद यांच्या मुलाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरू पोलिसांच्या टीमवर दारुच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी फैयाजसोबत आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर तो काही वेळ फरार होता. रात्री साडे बाराच्या वाजण्याच्या सुमारास बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. 

बंगळुरु (उत्तर पूर्व) डीसीपी सी के बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपूलाजवळ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार नसीर अहमद यांचा मुलगा फैयाज याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला तेव्हा दारुच्या नशेत होता असा आरोप आहे. याशिवाय त्याने पोलिसाच्या टीमवर प्राणघातक हल्ला देखील केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! मासेमारीला जाण्यासाठी विरोध केल्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीने नकार दिला म्हणून रागाच्या भरात पतीने तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याच्या या भयंकर प्रकारामुळे परिरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तातडीने पत्नीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcongressकाँग्रेसArrestअटक