लग्न सोहळ्यात गोंधळ; विटा, दगड फेकून मारले, 20 जणांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Updated: June 30, 2023 14:03 IST2023-06-30T14:03:46+5:302023-06-30T14:03:56+5:30

फिर्यादी गणेश अंपेपागोलू यांच्या भावाचे लग्न राहत्या घराजवळ २८ जून रोजी सुरू होते.

Confusion at the wedding ceremony; Bricks, stone pelted, crime against 20 persons | लग्न सोहळ्यात गोंधळ; विटा, दगड फेकून मारले, 20 जणांवर गुन्हा

लग्न सोहळ्यात गोंधळ; विटा, दगड फेकून मारले, 20 जणांवर गुन्हा

सोलापूर : लग्न कार्यात आरडा-ओरड केल्याप्रकरणी जाब विचारल्याने गोंधळ घातल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गणेश सुरेश अंपेपागोलू ( वय २५, रा. बापूजी नगर, उत्तर सदर बाझार) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गणेश अंपेपागोलू यांच्या भावाचे लग्न राहत्या घराजवळ २८ जून रोजी सुरू होते. तेव्हा लग्नात जेवण सुरू असताना आरोपी हे लग्नात येऊन आरडा ओरड करू लागले. याचा जाब गणेश यांनी विचारला असता आरोपींनी गोंधळ घालत परिसरातील विटा, दगड, फरशीचे तुकड्याने फेकून फिर्यादी व त्यांचे मित्र यांना जखमी केले. 

याशिवाय परिसरात लावलेल्या दुचाकी व रिक्षा वाहनाचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल झाला. अभिषेक चौधरी, गोविंद अंबेवाले, प्रकाश अंबेवाले, हिरा जमादार, आनंद पंतुवाले, शितल खंडेवाले, राजू अंबेवाले, नितीन अंबेवाले, कादर, निलेश ऊर्फ विचे याच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास इनामदार करत आहेत.

Web Title: Confusion at the wedding ceremony; Bricks, stone pelted, crime against 20 persons