भुताच्या भीतीने १८ वर्षांनी खुनाची कबुली; मला अटक करा, आरोपीची पोलिसांना विनवणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:05 AM2021-10-05T06:05:19+5:302021-10-05T06:06:38+5:30

माझ्या मैत्रिणीची छबेश्वर गोयल छेड काढायचा, त्यामुळे मी हत्या केली असं आरोपीने कबूल केले आहे.

Confession of murder after 18 years for fear of ghosts; Arrest me, accused to the police | भुताच्या भीतीने १८ वर्षांनी खुनाची कबुली; मला अटक करा, आरोपीची पोलिसांना विनवणी  

भुताच्या भीतीने १८ वर्षांनी खुनाची कबुली; मला अटक करा, आरोपीची पोलिसांना विनवणी  

Next

दुर्ग : आपण ज्याचा आपण खून केला, त्याचे भूत रोज स्वप्नात येऊ न आपणास त्रास देत आहे, त्यामुळे मला अटक करा, असे सांगण्यासाठी छत्तीसगडमधील टिक कोलियारा नावाचा एक एसम पोलीस ठाण्यात गेला. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा नव्याने तपास सुरू केला आहे. 

छबेश्वर गोयल नावाच्या तरुणाची २००३ साली हत्या झाली होती. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे जाणे थांबवले. त्यामुळे पोलिसांनीही तपासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे फाइलही बंद झाली. पण आता ती मीच हत्या करून मृतदेह खड्डय़ात लपवून ठेवला होता. छबेश्वर भूत बनून स्वप्नात येतो, मला त्रास देतो, असे टिकम कोलियाराने पोलिसांना सांगितले.

मैत्रिणीची छेड....
माझ्या मैत्रिणीची छबेश्वर गोयल छेड काढायचा, त्यामुळे मी हत्या केली. हत्येनंतर मी छबेश्वरच्या घरी फोन करायचो, मी छबेश्वर आहे, मी व्यवस्थित आहे, काळजी करू नका, असे सांगायचो. पण पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला, तेव्हा मी गाव सोडले.

 

Web Title: Confession of murder after 18 years for fear of ghosts; Arrest me, accused to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस