शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:10 IST

UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात पोलिसांच्या अत्यंत लाजिरवाण्या आणि संतापजनक कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. एका तरुणीची छेडछाड ...

UP Crime:उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात पोलिसांच्या अत्यंत लाजिरवाण्या आणि संतापजनक कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. एका तरुणीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर विचित्र प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्याने पीडितेला न्याय देण्याऐवजी तो आरोपीला घेऊन थेट पीडितेच्या घरी तडजोड करण्यासाठी घेऊन गेला. प्रकरण मिटवून टाक नाहीतर तुझीच समाजात बदनामी होईल असाही धक्कादायक सल्ला त्या पोलीस अधिकाऱ्याने दिला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

कानपूर येथील एका तरुणीची छेडछाड झाली होती. तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटकही केली. मात्र, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्याऐवजी बिठूर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अत्यंत गंभीर प्रकार केला. या पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीची गांभीर्याने नोंद न घेता, छेडछाड करणाऱ्या तरुणाला सोबत घेतले आणि त्याला घेऊन पीडित मुलीच्या घरी पोहोचला.

पीडितेच्या घरी पोहोचल्यावर, पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबीयांवर दबाव आणण्यास सुरुवात केली.'हा लहान मुलगा आहे, त्याचे करिअर खराब होईल. तुम्ही प्रकरण इथेच मिटवून टाका (तडजोड करा)', असे सांगत त्याने पीडितेच्या कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. पोलिसांनीच आरोपीची बाजू घेतल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

आरोपीचे नाव देवेंद्र प्रजापती आहे. त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. कथित "मांडवाली" घडवणारा निरीक्षक अभिषेक कुमार शुक्ला आहे. देवेंद्र प्रजापती कोचिंग क्लासला जात असताना पीडितेला वारंवार त्रास देत असे. काही दिवसांपूर्वी, आरोपीने तरुणीला आपल्या गाडीत ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी ती पळून जाण्यात यशस्वी झाली, पण जर तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिच्यावर अ‍ॅसिड ओतून जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.

जेव्हा ही बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि सोशल मीडियावर या घटनेची जोरदार टीका झाली, तेव्हा तातडीने कारवाई करण्यात आली. छेडछाडीच्या आरोपीला घेऊन पीडितेच्या घरी गेलेल्या त्या उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Settle or face defamation: Police took molester to victim's home!

Web Summary : UP police outrage: Officer took molester to victim's home for settlement. Threatened defamation if she didn't comply. Accused had prior offenses and threatened acid attack. Officer suspended after public outcry.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी