शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गुप्तांग कापण्याच्या प्रकरणात गुंतागुंत : मुलगी व भाचीसोबतची मैत्री खटकल्याने कृत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 04:50 IST

शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवला म्हणून अनुकूल (नाव बदलले आहे) या तरुणाचे गुप्तांग छाटून टाकण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या अंबिका (नाव बदलले आहे) या महिलेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील गुंतागुंतीची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

डोंबिवली : शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवला म्हणून अनुकूल (नाव बदलले आहे) या तरुणाचे गुप्तांग छाटून टाकण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या अंबिका (नाव बदलले आहे) या महिलेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील गुंतागुंतीची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनुकूलचा अंबिकाच्या कन्येशी व भाचीशी चांगला परिचय असल्याची चर्चा असून त्याला असलेल्या विरोधातून तिने हे कृत्य केले किंवा कसे, या दृष्टिकोनातून तपास पुढे केला जाण्याची दाट शक्यता आहे.अनुकूलला धडा शिकवण्यास अंबिकाला मदत करणारा तेजस म्हात्रे हा बेरोजगार असून अंबिका व तेजस यांच्या संबंधांबाबतही पोलीस माहिती घेत आहेत. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने अंबिका व तेजसची गाठभेट झाली. पुढे त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यामुळेच अनुकूलला धडा शिकवण्याकरिता अंबिकाने तेजसची मदत घेतली का? तेजसचा तिच्या कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. अनुकूलला मारहाण करून त्याचे गुप्तांग कापण्याच्या प्रकारात अंबिका व तेजस यांना सहकार्य करणारा प्रवीण केनिया हा ड्रायव्हर आहे. अंबिकाच्या विनंतीवरून तेजसने केनिया याची या कृत्याकरिता मदत घेतली, अशी माहिती चौकशीत उघड झाल्याचे समजते.अनुकूल याला धडा शिकवण्याकरिता तुम्ही दोघे मला मदत करा. मात्र, मी पोलिसांकडे तुमच्या नावाची वाच्यता करणार नाही. गुन्हा स्वत:च्या अंगावर घेईन, असे अंबिकाने त्यांना सांगितले होते. मात्र, अनुकूलला झालेली गंभीर मारहाण पाहिल्यावर हे केवळ एका महिलेचे कृत्य असूच शकत नाही, असे लक्षात आल्याने पोलिसांनी अंबिकाची चौकशी केली असता तिने दोघांची नावे सांगितली. त्यामुळे अंबिका, तेजस व प्रवीण हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. अंबिकाने फसवल्याने आता त्या दोघांना पश्चात्ताप होत आहे. जसजशी चौकशीत प्रगती होत जाईल, तसतसा या प्रकरणावर प्रकाश पडेल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.त्याची प्रकृती गंभीरचमेंदूला इजा झाल्याने तसेच गुप्तांग कापल्याने एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या तरुणाच्या प्रकृतीत तसूभरही सुधारणा झालेली नाही. मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून गुप्तांग कापल्याने त्याचा रक्तस्राव सुरूच आहे. या रुग्णावरील उपचाराकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे डॉक्टरांनी सांगितले.अंबिका हिने अटक झाल्यावर चौकशीत अनुकूल हा आपला शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवत असल्याने आपण त्याला अद्दल घडवल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, अंबिकाच्या परिचितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुकूल याची अंबिकाच्या कन्येशी व त्यांच्या घरी येणाऱ्या तिच्या भाचीसोबत ओळख होती. ही बाब अंबिकाला खटकत असल्याने तिचा त्याच्यासोबत खटका उडत होता. त्या रागातून तिने हे कृत्य तर केले नाही ना, या दृष्टीने पुढील तपास होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली