अनधिकृत फलकांसाठी 16 प्रकरणात पोलिसात तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:16 PM2019-03-16T16:16:16+5:302019-03-16T16:24:04+5:30

मुंबई उपनगर जिल्हयात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी

Complaint in police station against unauthorized posters, banners | अनधिकृत फलकांसाठी 16 प्रकरणात पोलिसात तक्रार  

अनधिकृत फलकांसाठी 16 प्रकरणात पोलिसात तक्रार  

ठळक मुद्देआतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 9 हजार 298 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढून टकण्यात आले आहेत.अनधिकृत जाहिरात फलकांच्या 16 प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई - सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी  10 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई उपनगर जिल्हयातील चार लोकसभा मतदार संघात आचारसंहितेची अंमलबजावणी होत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 9 हजार 298 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढून टकण्यात आले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरिल 2 हजार 260 असे एकुण 11 हजार 558 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढून टकण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलकांच्या 16 प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य करण्यासाठी सह आयुक्त/ उपायुक्त यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या सहायक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे. 

आचारसंहिता काळात राजकीय पक्ष व उमेदवार हे आचारसंहितेचे काटेकोर पालन करतात किंवा नाही यावर लक्ष कसे ठेवावे व भंग झाल्यास काय कारवाई करावी नुकतेच  प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी दिली आहे.

Web Title: Complaint in police station against unauthorized posters, banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.