पुणे : एकतर्फी प्रेमातून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात वेळोवेळी त्रास देणाºया युवकाविरोधात दत्तवाडी पोलिसांनी अवघ्या ११ तासांत दोषारोपपत्र सादर केले आहे.किरण भागवत कदम (वय १९, रा. कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत बारावीत शिकणाºया १९ वर्षीय मुलीने दत्तवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पीडित मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे.अपघात झाल्यामुळे वडील काहीही काम-धंदा करू शकत नाही व आई धुणीभांडी करून संसार चालवत आहे. आरोपी हा तिला एकतर्फी प्रेमातून रस्त्यात त्रास देत. त्याने अनेकदा हा प्रकार केला. तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. या बाबत आपण तक्रार करावी का नाही, या संभ्रमात असतानाच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतील भरोसा सेलमार्फ त सुरू असलेल्या कार्यक्रमानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून संपूर्ण हकिगत समजावून घेतली. त्यानंतर तिची तक्रार दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी नोंदवून घेतली. त्यानुसार आरोपीवर अवघ्या ११ तासांमध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून ११ तासांत दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:07 IST