शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी सीईओ महिलेने केली पाेटच्या चिमुकल्याची हत्या; कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 06:14 IST

घटस्फोटित पती मुलाला भेटू नये म्हणून झाली सैतान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: घटस्फोटित पतीला अद्दल घडविण्यासाठी ईर्षेने पेटलेल्या एआय कंपनीच्या महिला सीईओने आपल्याच ४ वर्षांच्या बाळाचा खून केल्याची घटना गोव्यात घडली. सूचना सेठ असे निर्दयी मातेचे नाव असून बाळाचा मृतदेह बॅगमध्ये भरून बंगळुरूला जात असताना पोलिसांनी तिला अटक केली.

सूचनाचे पती विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दोघांतील संबंध बिघडल्याने घटस्फोटापर्यंत प्रकरण वाढले. न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे देण्यासह वडिलांना आठवड्यातून एकदा मुलाची भेट घेण्याची मुभा दिली होती.

पतीने मुलाला भेटू नये म्हणून सूचना ६ जानेवारीला मुलाला घेऊन बंगळुरूहून विमानाने गोव्याला आली. पुढील तीन दिवस ती विविध ठिकाणी फिरली. ८ जानेवारीला मुलाचा खून केला आणि बाळाचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने बंगळुरूला निघाली. मात्र वाटेत असताना कॅबचालकाच्या मदतीने तिला अटक करण्यात आली.

कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

गोव्याहून बंगळुरूला परत जाण्यासाठी ८ जानेवारीला रात्री तिने रिसेप्शनला कॅब बुक करायला सांगितले. विमानापेक्षा कॅबभाडे महागडे असल्याने रिसेप्शनला ते खटकले.  मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करताना तिच्या सोबत मुलगा दिसला नाही. सकाळी खोलीची स्वच्छ करताना रक्ताचे डाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.

...म्हणे मुलगा नातेवाइकांकडे थांबलाnपोलिसांनी बंगळुरूच्या दिशेने निघालेल्या कॅब चालकाला फोन करून सूचना यांच्याशी बोलणे करण्यास सांगितले. nत्यानुसार पोलिसांनी सूचना यांना मुलाबाबत विचारले असता, तो नातेवाइकांकडे थांबल्याचे सांगितले. संशय येऊ नये म्हणून नातेवाइकांचा पत्ताही दिला.परंतु तो खोटा निघाला. nअखेर पोलिसांनी पुन्हा कॅबचालकाला नजीकच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि पुढे आयमंगल पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोट