शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

"४ दिवस शिल्लक आहेत, जे करायचेय ते करा", CM योगी आदित्यनाथांना जिवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 08:38 IST

UP CM Yogi Adityanath gets death threat : पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही धमकी आली होती. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) आपत्कालीन सेवा डायल ११२ च्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना हा  धमकीचा मेसेज (Threat Call) पहिल्यांदाच आला नाही, तर याआधीही आला आहे. त्यामुळे पोलीस विशेष सतर्क आहेत. दरम्यान, या मेसेजसंदर्भात पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे आणि नंबरची चौकशी करून आरोपीचा शोध घेत आहेत. (UP CM Yogi Adityanath gets death threat; 'you have four days', warns WhasApp message on UP police helpline)

मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा डायल ११२ व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मेसेज करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "मुख्यमंत्र्यांजवळ ४ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे या ४ दिवसांत माझे काय करायचे आहे, ते करा. ५ व्या दिवशी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींना ठार करेन", असे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरूधमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. घाईघाईत धमकी देण्यात येणाऱ्या क्रमांकाची तपासणी करण्यासाठी सर्व्हिलान्स टीम तैनात केली आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये कंट्रोल रूम डायल ११२ चे ऑपरेशन कमांडर अंजुल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे, जे सर्व्हिलान्स सेलच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्र्यांना यापूर्वीही धमकी योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही धमकी आली होती. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातून एकाला अटक केली होती.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी