मुंबई - वाहनाचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि चौघे जखमी झाले. विद्याविहार परिसरात गुरुवारी घडलेल्या या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्याविहार पूर्व येथील मोहन नगरमधील बंजारा वस्ती येथून दीपक चावरिया (२९) व त्यांचा भाऊ मनोज (३२) मोटरसायकलवरून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जात होते. अरुंद गल्लीतून जाताना दीपक यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला. त्यामुळे तेथे राहणारा संदीप पारचा (२८) व त्याचे वडील पालसिंग पारचा (७०) यांना राग आला. त्यांनी दीपक व मनोज यांना शिवीगाळ केली. या दोघांनी जाब विचारल्यावर पारचा पिता-पुत्रांनी धक्काबुक्की केली. दीपक व मनोज यांचे वडील मनोहर चावरिया (५७), बहीण पूजा (३६) यांनी पारचा पिता-पुत्राला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, संदीप पारचा याने घरातून चाकू आणून दीपक, मनोज, पूजा व मनोहर चावरिया यांच्यावर हल्ला केला. त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात मनोहर चावरिया यांच्या डाव्या बरगडीजवळ गंभीर जखम झाली व अन्य तिघेही जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मनोहर चावरिया यांचा मृत्यू झाला. या घटनेत संदीप पारचा, पालसिंग पारचा, कृष्णा पारचा (६०), बालसिंग पारचा यांनाही दुखापती झाल्या आहेत.
हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी; एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:31 IST
विद्याविहार परिसरात गुरुवारी घडलेल्या या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी; एकाची हत्या
ठळक मुद्दे चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि चौघे जखमी झाले. या घटनेत संदीप पारचा, पालसिंग पारचा, कृष्णा पारचा (६०), बालसिंग पारचा यांनाही दुखापती झाल्या आहेत. या दोघांनी जाब विचारल्यावर पारचा पिता-पुत्रांनी धक्काबुक्की केली.