शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

शहरात सायंकाळी सहा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी खळबळ, लाखोंचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:44 IST

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

पुणे : पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती़ त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला़ सिंहगड रोड परिसरात तीन, कोथरुड, वारजे येथे एका तासात पाच तर वानवडी येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक घटना घडली आहे.गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२च्या दरम्यान मोटारसायकलवरील दोघांनी संपूर्ण शहरात धुमाकूळ घालून तब्बल १४ सोनसाखळ्या हिसकावून नेल्या होत्या़ त्यातील दोघांना पोलिसांनी काही दिवसांनी पकडले होते़ त्यानंतर शहरात एकाच दिवशी सहा सोनसाखळी हिसकाविण्याच्या ६ घटना प्रथमच घडल्या आहेत.नºहे येथील मानाजीनगर गणपती मंदिराशेजारील भाजी मंडईत सायंकाळी ६ वाजता शारदा शिवाजी सालपे (वय ५१, रा़ सुश्रुत रेसिडेन्सी, मानाजीनगर) या सुनेसोबत भाजीसाठी गेल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले़ दरम्यान वडगांव बुद्रुक येथेही जिजामाता बहुउद्देशीय केंद्राच्या इमारतीसमोरून संध्याकाळी सव्वासहा वाजता वॉकिंगला जाणाऱ्या संगीता जावळकर (वय ४७, रा़ पॅलेस इमारत, माणिकबाग पेट्रोलपंपासमोर, वडगाव बुद्रुक) यांच्या गळ्यातील १ लाख १३ हजार रुपयांचे गंठण हिसकावून नेले़ त्यानंतर पाच मिनिटांनी गोयलगंगा सोसायटीजवळ ४७ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे गंठण हिसकावले. त्यानंतर दहा मिनिटांनी संतोष हॉल जवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. सलग तीन घटनांमुळे सिंहगड रस्ता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, एकाच टोळीने हे गुन्हे केले आहेत.कोथरूड येथे उजव्या भुसारी कॉलनीमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी भुसारी कॉलनीपासून जवळच असलेल्या वेदभवनजवळ साखळी चोरीची घटना घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण मंदिरामध्ये गेल्या होत्या. तेथून त्या परत जात असताना त्यांचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले. वानवडीतील विकासनगर येथे नऊच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची साखळी लंपास केली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारी