शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीत अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याची सुखरूप सुटका करण्यात शहर पोलिसांना यश

By नितीन पंडित | Updated: January 28, 2023 01:25 IST

हनुमान नगर कामतघर येथील सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धूत होत्या. त्या वळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते.

भिवंडी : शहरात २६ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले असून विक्री करण्यासाठी चिमुरड्याची चोरी करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

हनुमान नगर कामतघर येथील सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धूत होत्या. त्या वळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला असता घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके व वरिष्ठ पो. निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि रविंद्र पाटील,पो हवा खाडे, राणे, भोसले, पवार, कोदे, नंदिवाले, हरणे, गावीत यांचे पथक तयार करून नेपाळ सीमेपर्यंत तपास करीत असता एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपासाने संशयित गणेश नरसय्या मेमुल्ला वय ३८ रा. भाग्य नगर,कामतघर यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली. त्याने मूल चोरी करून १ लाख ५ हजार रुपयांना विक्री केल्याचे कबूल केले. 

यानंतर पोलीस पथकाने पद्मानगर नवजीवन कॉलनी या परिसरात राहणाऱ्या भारती सुशील शाहु वय ४१ व आशा संतोष शाहु वय ४२ वर्ष या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका करत गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन केले.या तिघां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आले आहे .

चिमुरड्यास एक लाखात विक्री भारती सुशील शाहु व आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून आशा हिस मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला.तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला भारती ची ओळख गणेश नरसय्या मेमुल्ला या सोबत असल्याने त्यांनी हा कट रचून मूल चोरी करून विक्री करण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला व त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुलाला पाहताच आईवडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू ....२६ डिसेंबर रोजी सिद्धांत हरविल्या पासून पानपट्टी चालवीणारे त्याचे वडील रामगोपाल व आई सुंदरी वेडेपिसे झाले होते .पोलीस तपास करीत असताना आई वडील सुध्दा शोध घेत वणवण फिरत होते .स्वतः जवळ गाडी नसताना शेजाऱ्यां कडून गाडी घेऊन व्यवसाय बंद करून मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात शोधून त्रस्त झाले होते. आई त्या धक्क्याने आजारी पडल्याने आठ दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले.२६ जानेवारी रोजी दोघे आईवडील भिवंडी शहरात शांतीनगर गैबी नगर परिसरात शोधून रात्री दहा वाजता घरी परतले.डोळ्यात दुःख भरलेले असताना शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी मोबाईल वर फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांच्या समोर चिमुरड्यास हजर केल्यानंतर आईवडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.ते आनंदाश्रू पोलिसांच्या शोधा मुळे शक्य झाले असे सांगत सुंदरी गौतम यांनी पोलिसांच्या सहकार्या बद्दल आनंद व्यक्त केला .

पोलीस उपायुक्तांनी केला पोलीस पथकाचा सन्मानशहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी महिनाभर या मुलाच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले होते पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत डबल एक महिन्यांनी मुलाची सुखरूप सुटका करून आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देत सन्मान केला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhiwandiभिवंडी