मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना तरुणाचा मृतदेह आढळला अन् माजली खळबळ
By पूनम अपराज | Updated: January 5, 2021 21:31 IST2021-01-05T21:29:00+5:302021-01-05T21:31:45+5:30
Murder : याप्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना तरुणाचा मृतदेह आढळला अन् माजली खळबळ
मालाड येथील मालवणी परिसरातील खारोडी परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. येथील एका मैदानात आज सकाळी हा मृतदेह आढळला आणि एकाच खळबळ माजली. तरुणाचा गळा धारदार चाकूने चिरला असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत.
खारोडी परिसरातील मैदानाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कारण कालच गोरेगाव येथे एका तरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही नागरिकांना तरुणाचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अशोक यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो त्याच परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला.