A citizen who went to cast a railway ticket was murdered with the intention of robbery | रेल्वे तिकीट टाकण्यास गेलेल्या नागरिकाची लुटीच्या उद्देशाने केली हत्या 
रेल्वे तिकीट टाकण्यास गेलेल्या नागरिकाची लुटीच्या उद्देशाने केली हत्या 

मुंबई - १८ मार्च रोजी रमाशंकर यादव हे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रेल्वेची तिकीट काढण्यासाठी कुर्ला टर्मिनस येथे जाण्याकरिता कमलाबाई चाळ  गौरीशंकर पुलाजवळ असताना त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेऊन त्यांच्याकडील मोबाईल आणि पैश्याचे पाकीट दोन अज्ञात चोरटे लुटण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान रमाशंकरने दोन अज्ञात चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत दोघांपैकी एकाकडे चाकू होता. त्याने रमाशंकरने पोटात चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी करून हत्या केली. याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा डंख करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने  दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी अभिलेखावरील आहेत. 


Web Title: A citizen who went to cast a railway ticket was murdered with the intention of robbery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.