शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने लुटमार करणा-या दरोडेखोरांना सिनेस्टाईल अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:48 IST

भोर-महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोसांनी अटक केली.  

ठळक मुद्देभोर पोलिसांची कामगिरी : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 भोर :  भोर-महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोलिसांनीअटक केली. या गुन्हात एका महिलेसह तीन तरुण असुन एक जण फरार झाला. आरोपींनकडुन एक कार,  एक मोटर सायकल यांच्यासह   दोन कोयते, एअर गन, मिरची पावडर,  पाच मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजाराचा एैवज जप्त केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता घडली.   अक्षय महेंद्र यादव (वय १९ रा आंबेघर ता.भोर), विक्रम विजय शिंदे (वय १९, पिंपळेगुरव पुणे, संदीप आनंदा हिरगुडे (वय ३१ रा हर्णस ता.भोर), दिपीका आनंद शिळीमकर (वय २४, रा मोहननगर धनकवडी पुणे) यांना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी  फरार झाला आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. आरोपींकडून एक दुचाकी आणि एम मोटार कार पोलिसांनी जप्त केली आहे.  

भोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पाचवा फरार असलेला आरोपी अक्षय यादवला शोधण्यासाठी जात होता.  पहाटे ५ वाजता आंबेघर येथील निरानदीजवळ लाल रंगाच्या कारमध्ये  एक महिला व एक जण होते तर एक जण मोटर सायकलवर बसला होता. हे सर्वजण संशयस्पद वाटल्याने पोलिसांनी कार थांबवून त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे दोन कोयते, १ गावठी कट्यासारखी दिसणारी एअर गन, लाल मिरची पावडर,  पाच मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजाराचा माल पोलीसांनी जप्त केला. यावेळी एक आरोपी फरार झाला.  या कारवाईत २१ मार्चला महाड भोर रोडवर गाडी अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन लुटमार करणारा आणि फरार असलेला  आरोपी अक्षय महेंद्र यादव सापडला आहे. एक महिला व इतर पाचजण महाडरोडवर महिलेला उभे करुन लिफट मागण्याच्या बहाण्याने गाड्या आडवुन त्यांना लुटण्याच्या तयारीत होते. मात्र, भोर पोलीसांच्या सर्तकतेमुळे गुन्हा होण्याआधीच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अशाच प्रकारे लहान मोठे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार प्रदीप नांदे, आप्पा हेगडे, अमोल शेडगे, प्राजक्ता जगताप, अनिल हिप्परकर, दत्तात्रय खेंगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे करीत आहेत.......................याब टोळीत एक महिला असुन महिलेला रस्त्यावर लिफट देण्याच्या बाहण्याने गाडी थांबवुन त्यानंतर झाडीत लपलेल्या इतर आरोपींनी कोयता पिस्तुलाचा धाक दाखवुन मिरची पावडर डोळयात टाकुन वाहन चालकासाह गाडीतील प्रवाशांना ही टोळी लुटत होती. ही   सराईत गुन्हेगारांची टोळीच होती. यातील एक आरोपी सागर यादव पोलीस रेकॉर्डवरचा गुन्हेगार असुन त्याला दरोडा टाकताना पकडुन त्याची रवानगी येरावडयाला केली आहे.   ................. जिल्हा अधिक्षकांनी दिले भोर पोलिसांना २५ हजार रूपये बक्षीसभोर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अट्टल चोरांना अटक केली. भोर पोलिसांच्या या धाडसी कामगीरीचे कौतूक पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी केले असून या बद्दल २५ हजारांचे बक्षिसही पोलिसांना दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक